You are currently viewing सिंधुदुर्ग सुपुत्र श्री.गोविंद हळदणकर ज्येष्ठ नागरिक पुरस्काराने सन्मानित

सिंधुदुर्ग सुपुत्र श्री.गोविंद हळदणकर ज्येष्ठ नागरिक पुरस्काराने सन्मानित

श्री.बिपीन श्रीमाळी (भा.प्र.से.) यांची प्रमुख उपस्थिती

कुडाळ:

झाराप ग्रामस्थ व विद्यार्थी उत्कर्ष मंडळ मुंबईचे वार्षिक स्नेहसंमेलन परळ येथील दामोदर हॉल मध्ये रविवार दिनांक २४ जुलै २०२२ रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाले. स्नेहसम्मेलनासाठी अध्यक्षपदी सन्मा. श्री. बिपीन श्रीमाळी (भा.प्र.से.) व्यवस्थापकीय संचालक, महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ, प्रमुख पाहुणे सिने-नाट्य अभिनेत्री ऋतुजा बागवे, सोबत मंडळ प्रमुख सचिन हराळे आदी उपस्थित होते.


मंडळाच्या दामोदर हॉल परळ येथे पार पडलेल्या वार्षिक स्नेहसम्मेलनामध्ये झाराप ग्रामस्थ आणि विद्यार्थी उत्कर्ष मंडळाचे माजी मंडळ प्रमुख गोविंद पंढरीनाथ हळदणकर यांच्या षष्ट्यब्दीपूर्ती निमित्त मंडळाने ज्येष्ठ नागरिक पुरस्काराने सन्मानित केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्मा.श्री.बिपीन श्रीमाळी(भा.प्र. से.) व्यवस्थापकीय संचालक, महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ, यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. सोबत मंडळ प्रमुख सचिन हराळे, शालांत परीक्षेत प्रथम आलेली कु.स्वरा वेंगुर्लेकर, हिंदी मराठी साहित्यिक डॉ.रमेश यादव आदींचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी सिने नाट्य अभिनेत्री ऋतुजा बागवे, शिक्षण प्रमुख विशाल पोळ, सहाय्यक शिक्षण प्रमुख साहिल पाटील आदी उपस्थित होते.
शैक्षणिक, कला व क्रीडा पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा असा हा कार्यक्रम आयोजित केला गेला होता.

प्रतिक्रिया व्यक्त करा

19 + nineteen =