शिरोडा-वेळागर येथेही बंधार्यांची नितेश राणेेंकडे मागणी
वेंगुर्ले
रेडी यशवंत गडाच्या पायथ्याशी समुद्राच्या काठावर बंधारा नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात येणार्या लाटामुळे गडाच्या तटबंदीला धोका निर्माण झाला आहे. तसेच शिरोडा-वेळागर येथे पाणी वस्तीत घुसत आहे. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी बंधारा बांधण्यासाठी आवश्यक असलेला निधी तात्काळ मंजूर करा अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रितेश राऊळ यांनी आमदार नितेश राणे यांच्याकडे केली आहे. दरम्यान याबाबत आपण लवकरात लवकर पाठपुरावा करू, असे आश्वासन श्री. राणे यांनी दिले. यावेळी श्री. राऊळ यांनी आपल्या सहकारी ग्रामस्थांच्या उपस्थितीत नुकतीच श्री. राणे यांची भेट घेतली.
यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, पंचायत समिती माजी सदस्य चित्रा कन्याळकर तसेच सागर राणे, घन्यशाम वरखंडकर, रोहित गवंडी, श्री. माडये, श्री.चांदरकर आदी उपस्थित होते.