You are currently viewing गाव अन् शाळा तिथे “कोमसाप” या आगळ्यावेगळ्या उपक्रमांतर्गत मळगाव न्यू इंग्लिश स्कूल येथे रंगला बाल साहित्यिकांचा साहित्य सोहळा

गाव अन् शाळा तिथे “कोमसाप” या आगळ्यावेगळ्या उपक्रमांतर्गत मळगाव न्यू इंग्लिश स्कूल येथे रंगला बाल साहित्यिकांचा साहित्य सोहळा

कोमसाप, सावंतवाडी शाखा आणि मळगाव न्यू इंग्लिश स्कूलचे संयुक्त आयोजन

कोकण मराठी साहित्य परिषद, सावंतवाडी शाखा नूतन कार्यकारिणी निवड झाल्यानंतर साहित्य चळवळ पुढे सुरू ठेवण्यासाठी नेहमीच आगळेवेगळे नियोजन करताना दिसत आहे. मागील महिन्यात निरवडे ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या सहकार्याने गाव तिथे कोमसाप हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडल्यानंतर आज दि. २३ जुलै २०२२ रोजी मळगाव न्यू इंग्लिश स्कूल, मळगाव, ता. सावंतवाडी येथे शाळेतील मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी, मुलांना स्टेज डेअरिंग, साहित्याची साहित्यिकांची ओळख होण्यासाठी, मुलांमध्ये लेखन, वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी, त्याच प्रमाणे आपण लिहिलेले साहित्य सादरीकरण इत्यादी बरोबर मराठी, मालवणी भाषेचे संवर्धन करण्याच्या दृष्टीने सावंतवाडी कोमसाप शाखा आणि मळगाव इंग्लिश स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने “शाळा तिथे कोमसाप” हा कार्यक्रम राबविण्यात आला.
मळगाव शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम.सावंत, शिक्षिका श्रीम.प्रज्ञा मातोंडकर, श्रीम.ऋतुजा सावंत-भोसले मॅडम आणि सहकारी स्टाफ यांनी कार्यक्रमाचे उत्तम नियोजन केले होते. प्रशाळेचे चेअरमन व कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.मनोहर राऊळ, कोमसापचे मार्गदर्शक व कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉ.जी.ए. बुवा, कोमसाप जिल्हा खजिनदार भरत गावडे, कोमसाप तालुकाध्यक्ष पत्रकार संतोष सावंत, मुख्याध्यापिका प्रमिला राणे-सावंत मॅडम आदींनी दीपप्रज्वलन करून माता सरस्वतीला पुष्पहार अर्पण केला. कोमसाप सावंतवाडी शाखेच्या सहकार्याने पार पडलेल्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कोमसाप सहसचिव राजन तावडे यांनी केले. कोमसाप कार्यकारिणी सदस्य कवी दीपक पटेकर यांनी शेतकऱ्यांच्या जीवनावर लिहिलेली “भाकर” ही मार्गदर्शनपर अष्टाक्षरी काव्यरचना सादर करून कार्यक्रमाचे उदघाटन झाल्याचे जाहीर केले.
शाळेतील मुलांच्या कलागुणांना वाव देणे, त्यांच्या मनात वाचन, लेखन आणि वाचलेल्या लिहिलेल्या पुस्तकातील आशयाचे आकलन होण्यासाठी त्या कथा, कादंबरी, कवितेचे रसग्रहण करणे, मराठी मालवणी भाषेची गोडी निर्माण होण्यासाठी मुलांना पुस्तकाचे वाचन, धडा वाचन किंवा कविता वाचन, लेखन करून त्याचे रसग्रहण करण्याची संधी देण्यात आली. अगदी काहीच दिवसात नियोजन करूनही तब्बल २३ मुले/मुलींनी काव्यरचना लिहिल्या, सादरही केल्या. काहींनी विविध लेखकांच्या कादंबरीचे रसग्रहण केले. त्यामुळे मुलांमध्ये दडलेले सुप्त गुण बाहेर येण्यास वाव मिळाला. काहींच्या काव्यरचना आणि रसग्रहण अतिशय उत्कृष्ट असल्याने भविष्यात मळगाव येथून देखील उत्तम साहित्यिक पुढे येतील अशी आस निर्माण झाली आहे. कार्यक्रमासाठी डॉ.दीपक तुपकर, मुख्याध्यापिका प्रमिला राणे- सावंत, भरत गावडे, कवी विठ्ठल कदम, संतोष सावंत, नकुल पार्सेकर, प्रतिभा चव्हाण आदींनी मार्गदर्शन करत शुभेच्छा दिल्या. ऍड नकुल पार्सेकर यांनी हल्ली वाढत चाललेल्या मोबाईल फोनच्या वापरासंबंधी मार्गदर्शन करताना मोबाईल सकारात्मक दृष्टिकोन समोर ठेऊन चांगल्या कामासाठी वापरण्याचा सल्ला दिला तर कोमसाप सदस्य प्रा.रुपेश पाटील यांनी मळगाव स्कूलच्या मुलांमध्ये प्रचंड गुणवत्ता आहे, कोमसाप नेहमीच मुलांना सहकार्य करेल अशी ग्वाही दिली. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉ.जी.ए. बुवा यांनी आपले विचार मांडताना कोमसापचा “गाव शाळा तिथे कोमसाप” हा स्तुत्य उपक्रम असून त्यातून नक्कीच साहित्य चळवळीला एक नवी दिशा मिळेल. मुलांनी अशा उपक्रमांमध्ये सहभाग घरून आपल्या सुप्त कलागुणांना वाव देऊन आपला विकास साधावा असे सांगितले . आपल्या सुमधुर आवाजात शिक्षिका श्रीमती प्रज्ञा मातोंडकर यांनी सूत्रसंचालन केले. तर आभार प्रदर्शन श्रीम.ऋतुजा सावंत-भोसले यांनी केलं.
मळगाव न्यू इंग्लिश स्कूल येथे पार पडलेल्या कार्यक्रमात कोमसापचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष पत्रकार संतोष सावंत, ज्येष्ठ सदस्य आणि सल्लागार डॉ.जी.ए.बुवा, सचिव प्रतिभा चव्हाण, सहसचिव राजन तावडे, खजिनदार डॉ.दीपक तुपकर, जिल्हा सचिव कवी विठ्ठल कदम, जिल्हा खजिनदार भरत गावडे, कार्यकारिणी सदस्य कवी दीपक पटेकर, प्रा.रुपेश पाटील, कवयित्री सौ.मंगल नाईक-जोशी, अटळ प्रतिष्ठान संस्थापक ऍड.नकुल पार्सेकर, शाळेचे चेअरमन मनोहर राऊळ, प्रशाला मुख्याध्यापिका श्रीम.सावंत मॅडम, कोमसाप सदस्या आणि प्रशाळेच्या शिक्षिका श्रीम.प्रज्ञा मातोंडकर, ऋतुजा सावंत भोसले, शिक्षक श्री.बाळा राऊळ, खानोलकर वाचनालयाचे अध्यक्ष हेमंत खानोलकर, तेजस राऊळ, मळगाव न्यू इंग्लिश स्कूलचे शिक्षकवर्ग, कर्मचारी वृंद आदींनी आपल्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढविली.


*मळगाव न्यू इंग्लिश स्कूलच्या या बालकवींनी उधळले काव्यरंग*
दरम्यान कार्यक्रमात पूर्वा गावकर – पाऊस, शांती गावडे – आई, योगिता मळेवाडकर – फुलपाखरू, पूर्वा पेडणेकर – मोर, प्रियांका पाटील – माझी शाळा, तनिष्का जाधव – पंढरीची वारी, लक्ष्मण नाईक – पाऊस, पूजा कोळेकर – अभिवाचन, निधी राऊळ – पुस्तक परीक्षण, याज्ञिका साटेलकर – गुरु, वेदिका मठकर – आई, हरिश्चंद्र बाईत – पाऊस, नरेश गावडे – माझी आई, समृद्धी चाळके – चहाचे भांडण, आर्या राणे – पाऊस, मोहिनी राऊळ – मैत्री, सुचित्रा धुरी – पुस्तक परीक्षण, आदिती राणे – आई आणि मी, श्रावणी बुगडे – जत्रा (मालवणी कविता), दिव्या निरवडेकर – मालवणी कविता यांनी कार्यक्रमात आपल्या काव्यप्रतिभेचे दर्शन घडविले व उपस्थित सावंतवाडी कोमसाप शाखेच्या पदाधिकाऱ्यांना तसेच श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

20 − 10 =