You are currently viewing कपडे वाळत टाकताना वायरचा स्पर्श लागून मोर्ले येथील महिलेचा मृत्यू

कपडे वाळत टाकताना वायरचा स्पर्श लागून मोर्ले येथील महिलेचा मृत्यू

दोडामार्ग

काल रात्री मोर्ले गावात राहणाऱ्या सौ शुभागी संतोष सुतार ही आपल्या राहत्या घरात आपले काम आटोपून रात्री कपडे धुतल्यांनंतर ते वाळत लोखंडी पाईप वर टाकण्यासाठी अंगणात गेली सदर पाईपला विद्युत तारेचा स्पर्श होऊन तीला जोरदार धक्का बसला त्यानंतर तात्काळ दोडामार्ग ग्रामीण रुग्णालय दाखल केले मात्र त्याआधी सौ. शुभांगी सुभाष सुतार (५०) हिचा मृत्यू झाला. रात्री उशीरा ही घटना घडली.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, सदर महिला गावात मोलमजुरी करून आपला चारितार्थ चालवायची. तिचा पती ही पक्षाघाताने आजारी आहे.त्यामुळे घराचा उदरनिर्वाह तिच्याच मोलमजुरीवर चालायचा, रात्री काम आटोपून ती कपडे धुवून ते वाळत टाकण्यासाठी गेली असता घरातील विद्युत तारेचा स्पर्श कपडे वाळत टाकणाऱ्या लोखंडी रॉडला झाला याचा धक्का शुभांगी सुतार यांना बसला. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, विवाहित मुली असा परिवार आहे याबाबत अधिक तपास पोलीस करत आहे आज दुपारी शवविचछेदनानंतर तिचा मृतदेह पोलिसांनी नातेवाईकांच्या ताब्यात दिला.

प्रतिक्रिया व्यक्त करा