You are currently viewing वसंत वैभव

वसंत वैभव

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री वैजयंती विंझे आपटे यांची अप्रतिम काव्यरचना

हळूच हसता कळी, सहज रंग गाली चढे
जसा पवन स्पर्शतो , सुभग तेज कांती चढे

वसंत सलगी करी , विरह साहवे ना परी
फुले खुलत हासती, टवटवीत फांदीवरी

वसंत सजवी धरा , बघ फुले पिसारा वनी
वसंत उधळी कसा , विविध रंग रानीवनी

सुरात जळ वाहते, जलतरंग हे स्पंदनी
सुरेल अवघी धरा, खळखळाट भावे मनी

मजेत झुलती कळ्या , दरवळे सुगंधी लता
बनात फुलला असा , बहर मोगऱ्याला अता

रसाळ मध चाखण्या, खग, विहंगही नाचती
पहा भिरभिरे झुले, फिरत गाउनी गुंजती

कुहू सुखद घालते, मधुर साद नादावुनी
ऋतू मधुर हासतो, खलु प्रफुल्ल ही मोहिनी

*वैजयंती विंझे आपटे, पुणे*
मोबाईल – 9892836604

प्रतिक्रिया व्यक्त करा