You are currently viewing आरसा

आरसा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य, सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त लेखक कवी गझलकार जयराम धोंगडे लिखित अप्रतिम काव्यरचना*

*आरसा*

बोलला आरसा छानसा वाटतो,
धाव वेड्या जरा शर्ट का दाटतो?

माणसा वागणा माणसासारखा,
स्पर्श झाल्यावरी का कुणी बाटतो?

ऐकणे धर्म हा नीट ऐकून घे,
बोलतो जो खरे बोल का काटतो?

स्वाभिमानी रहा ताठ ठेवा कणा,
फालतू का उगा पाय रे चाटतो?

स्वार्थ येता मध्ये खेचतो केवढे?
बंध रक्तातला तेवढा फाटतो!

जयराम धोंगडे, नांदेड

प्रतिक्रिया व्यक्त करा