You are currently viewing CBSE निकाल जाहीर…

CBSE निकाल जाहीर…

भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या पहिल्या बॅचचा निकाल 100%..

यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या 10 वीच्या पहिल्या बॅचने CBSE बोर्डमध्ये १०० टक्के निकालासह घवघवीत यश संपादन केले आहे.
शाळेची ही 10 वी ची पहिलीच बॅच असून ३० विद्यार्थी या परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते. या सर्व विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य प्राप्त करत जिल्ह्यातील टॉप विद्यार्थ्यांच्या यादीत आपले नाव कोरले आहे.

यामध्ये वेदीका विनायक परब हिने ९५.८३% गुणांसह प्रथम क्रमांक, देवाशीष प्रसाद महाले याने ९५.६७% गुणांसह द्वितीय तर देवांग राजेश फोंडेकर याने ९३.००% गुणांसह तृतीय क्रमांक प्राप्त केला. दिया साईनाथ वेटे या विद्यार्थीनीने ८९.५०% गुण प्राप्त करत उत्तेजनार्थ क्रमांक पटकावला.

इंग्रजी विषयात वेदिका परब, देवाशीष महाले यांनी १०० पैकी ९८ गुण, हिंदी विषयात देवाशीष महाले, देवांग फोंडेकर, दिया वेटे यांनी १०० पैकी ९९ गुण प्राप्त करत विक्रम रचला. वेदिकाने गणित विषयात ९२ तर विज्ञान विषयात ९६, सामाजिक शास्त्रमध्ये ९८ तर IT मध्ये ९९ गुण प्राप्त केले. विद्यार्थ्यांना प्राचार्य व्यंकटेश बक्षी व शिक्षक वर्ग – प्रियांका डिसोझा, संदीप पेडणेकर, प्राची कुडतरकर, श्वेता खानोलकर, दिपीका कदम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

शाळेचे संस्थापक व कार्याध्यक्ष अच्युत सावंत-भोसले, अध्यक्षा ऍड.सौ.अस्मिता सावंत-भोसले, सचिव संजीव देसाई, प्रशासकीय अधिकारी सुनेत्रा फाटक यांनी गुणवंत विद्यार्थ्यी, शिक्षकांसह पालकांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा