You are currently viewing असलदे ग्रामपंचायतीच्यावतीने आझादी का अमृत महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम

असलदे ग्रामपंचायतीच्यावतीने आझादी का अमृत महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम

कणकवली

असलदे ग्रामपंचायतच्यावतीने आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत नियोजन बैठकीत विविध कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले. भारत देशाचा अभिमान साजरा करण्यासाठी प्रत्येक घरावर झेंडा, ग्रामपंचायत, प्राथमिक शाळांमध्ये विद्युत रोषणाई व गुढ्या उभारत आनंदोत्सव साजरा करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम ६ ते १६ ऑगस्ट २०२२ या कालावधीत साजरा करण्यात येणार आहे, असे सरपंच पंढरी वायंगणकर यांनी सांगितले.

असलदे ग्रामपंचायत रामेश्वर सभागृहात सरपंच पंढरी वायगंणकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. उपसरपंच संतोष परब,सदस्य संचिता नरे, प्रतिभा खरात, निलीमा तांबे, वंदना हडकर, दिनेश तावडे, पोलीस पाटील सावित्री पाताडे, तंटामुक्ती अध्यक्ष बाबाजी शिंदे,शाळा मुख्याध्यापक सावंत, जंगले, कदम गुरुजी, आशा सेविका भाग्यश्री नरे, अंगणवाडी सेविका सौ. परब, घाडी, तसेच आरोग्य विभागाच्या मराठे, खानोलकर तसेच प्रतिष्ठित ग्रामस्थ,ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.

आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत असलदे गावातील सर्व चालू घरांना तिरंगा झेंडा वाटप करणे, ग्रामपंचायत कार्यालयात निळ्या रंगामध्ये विद्युत रोषणाई,गावात गुढ्या उभारणे,ग्रामपंचायत कार्यालयात गुढ्या उभ्या उभारणे,सर्व प्राथमिक शाळांना विद्युत रोषणाई करणे,किशोवहीन मुलींना सॅनिटरी पॅड वाटप करणे,शेतक-यांना योजनांची माहिती देणे,बचत गटांना प्रशिक्षण देणे, गावात प्रचार फेरी काढणे, गावातील ओला व सुका कचरा गोळा करणेसाठी डस्टबिण वाटप करणे,हे कार्यक्रम आयोजित केले असल्याची माहिती असलदे सरपंच वायंगणकर यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

fourteen − 2 =