You are currently viewing नवोदय प्रवेश परीक्षेप्रश्नी भाजपा ने केलेल्या आंदोलनाला यश !!!

नवोदय प्रवेश परीक्षेप्रश्नी भाजपा ने केलेल्या आंदोलनाला यश !!!

प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई, जिल्हा सरचिटणीस, भाजपा सिंधुदुर्ग

वेंगुर्ले तालुक्यातुन जिल्हा बाहेरील फक्त तीनच विद्यार्थी उत्तीर्ण

केंद्र शासनाच्या वतीने घेण्यात येणारया नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी परीक्षेला बसत असतात . मात्र असे असतानाही परजिल्ह्यातील अनेक विद्यार्थ्यांचा नंबर नवोदयसाठी लागतो व सिंधुदुर्गातील विद्यार्थी वंचित रहातात .
गेल्या अनेक वर्षापासून हीच स्थिती आहे . या प्रकाराला शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार जबाबदार आहे , तेवढेच ज्या शाळा अशा परजिल्ह्यातील विद्यार्थ्यांची कागदोपत्री उपस्थिती दाखवतात , त्या शाळाही जबाबदार आहेत .
नवोदयसाठी ह्या वर्षी वेंगुर्ले तालुक्यातुन परजिल्ह्यातील ३६ विद्यार्थी प्रवेश परीक्षा देणार होते . परंतु भाजपा च्या वतीने स्थानिक विद्यार्थ्यांच्या पालकांना सोबत घेऊन वेंगुर्ले परीक्षा केंद्रावर उग्र आंदोलन केले , परंतु पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने ३६ मुलांपैकी काही मुलेच परीक्षा देऊ शकली .त्यामुळे परजिल्ह्यातील मुले उत्तीर्ण होण्याचे प्रमाण घटले व वेंगुर्ले तालुक्यातुन परजिल्ह्यातील फक्त तीनच ( ३ ) मुले उत्तीर्ण झाली , त्यामुळे भाजपा च्या आंदोलनाला यश मिळाले .

*परजिल्ह्यातील एकही मुल जोपर्यंत नवोदय साठी वेंगुर्ले तालुक्यातुन बसणार नाही तोपर्यंत भाजपा तर्फे लढा चालूच रहाणार* —-

वेंगुर्ले तालुक्यातील न्यु इंग्लिश स्कूल – मातोंड व शिवाजी हायस्कूल – तुळस याच हायस्कूल मध्येच परजिल्ह्यातील मुले नवोदय प्रवेश परीक्षेसाठी फक्त पाचवीत प्रवेश घेतात . सदर दोन्ही हायस्कूल ही घाटमाथ्यावरील संस्थेशी निगडीत असल्यामुळे तसेच घाटमाथ्यावरील शिक्षकांचे साटेलोटे असल्याने वेंगुर्ले तालुक्यातील फक्त या दोनच हायस्कूल मध्येच परजिल्ह्यातील मुले ही परीक्षेला बसत असतात .
*दोन्ही हायस्कूलला भाजपा च्या वतीने समज देणार* –—- लवकरच भाजपा वेंगुर्ले चे शिष्टमंडळ हे दोन्ही हायस्कूलना भेट देऊन मुख्याध्यापक तसेच शिक्षक पालक संघ व शाळा व्यवस्थापन समिती यांची भेट घेऊन , ह्यापुढे ह्या हायस्कूल मध्ये फक्त परीक्षेसाठी पाचवीत प्रवेश देऊ नये याबाबत समज दिली जाणार आहे . त्याचप्रमाणे पास झालेली तीन विद्यार्थी सोडून उर्वरित ३३ विद्यार्थी हे सहावीच्या वर्गात आहेत की नाही याची खातरजमा करण्यात येणार आहे . तसेच तुळस व मातोंड ग्रामपंचायत सरपंचांना भेटुन परजिल्ह्यातील मुलांना वास्तव्याचे दाखले देऊ नये अशा प्रकारची विनंती करण्यात येणार आहे .
*भाजपा च्या वतीने शिक्षण विभागाचे लक्ष वेधनार* —- परजिल्ह्यातील विद्यार्थी हे फक्त पाचवीतच प्रवेश घेऊन नवोदय ची प्रवेश परीक्षा देतात व जे विद्यार्थी नवोदय प्रवेश परीक्षेला नापास होतात ते विद्यार्थी शाळेतून दाखला काढून घेऊन आपल्या जिल्ह्यात परत जातात , अशा शाळांमध्ये शिक्षण विभागाच्या अधिकारयांना सोबत घेऊन भाजपा त्या शाळांचा भांडाफोड करणार आहे .तसेच अशा हायस्कूलची मान्यता रद्द करण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करणार असल्याचे सांगितले . तसेच ह्यापुढे सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकही परजिल्ह्यातील विद्यार्थी नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेला बसणार नाही यासाठी भाजपा च्या वतीने सुरुवातीलाच खबरदारी घेणार आहे .
*स्थानिक पालक , शिक्षक व मुख्याध्यापक यांचेकडुन भाजपा चे आभार !!!* —- संपुर्ण जिल्ह्यात भाजपा ने जे आंदोलन उभे करून स्थानिक विद्यार्थ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला व त्याला यशही आले , त्याबद्दल जिल्ह्यातील बरयाच मुख्याध्यापक , शिक्षक व पालकांनी भेटुन तसेच फोनवरून आभार मानले .

प्रतिक्रिया व्यक्त करा