You are currently viewing आरोस नागोजी शाळेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

आरोस नागोजी शाळेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

सावंतवाडी मनसे शहराध्यक्ष आशिष सुभेदार यांचा उपक्रम

सावंतवाडी

मनसेच्या वतीने आरोस नागोजी शाळेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणीक साहित्याचे वाटप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सावंतवाडी शहराध्यक्ष आशिष सुभेदार यांच्या माध्यमातून करण्यात आले.
तसेच आरोस मनसेच्यावतीने जिल्हा परिषद शाळा आरोस नागोजी या शाळेतील विद्यार्थ्यांना मनसे पदाधिकाऱ्यांचे हस्ते शैक्षणिक साहित्याचे (दप्तर,वह्या)वाटप करण्यात आले. आरोस मनसे शाखा व मळेवाड मतदार संघ मधील महाराष्ट्र सैनिक नंदू परब यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांचे गुलाब पुष्प देऊन करण्यात आले. कार्यक्रमाची प्रस्तावना शाळेचे शिक्षक रुपेश मोरजकर यांनी मांडली. तर सूत्रसंचलन मनसेसैनिक नंदू परब यांनी केले.

यावेळी व्यासपीठावर मनसे मळेवाड मतदार संघाचे अध्यक्ष मंदार नाईक, शहर अध्यक्ष आशिष सुभेदार, उपशहर अध्यक्ष शुभम आरोस विद्याविहार शिक्षण संस्थेचे अध्यक्ष निलेश(बाळा) परब, महाराष्ट्र सैनिक नंदू परब,प्रवीण आरोसकर,मुकुंद धारगळकर ,धनेश नाईक ,मदन मुरकर, अभय देसाई तसेच शिक्षक रुपेश मोरजकर,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शंकर पेडणेकर,उपाध्यक्ष शोभा पेडणेकर, गजानन पटेकर,सागर पटेकर,रेश्मा पेडणेकर,पूर्वी पेडणेकर,सुप्रिया पेडणेकर, जॉनीता मेंडिस,विद्यार्थी,पालक आदी उपस्थित होते.आभार प्रदर्शन रुपेश मोरजकर यांनी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा