You are currently viewing तळेरे हायस्कूल मध्ये एस.एस.सी , एच. एस.सी मध्ये यशवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ संपन्न

तळेरे हायस्कूल मध्ये एस.एस.सी , एच. एस.सी मध्ये यशवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ संपन्न

वामनराव महाडीक विद्यालयात दहावी , बारावी विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ संपन्न

वामनराव महाडीक माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय तळेरे मध्ये दहावी , बारावी मधील यशवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ नुकताच पार पडला . यावेळी शाळा समिती चेअरमन अरविंद महाडीक , शरद वायंगणकर , संतोष तळेकर , निलेश सोरप , मुख्याध्यापक संभाजी नलगे, अविनाश मांजरेकर , आदी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.


सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षामध्ये एस.एस.सी. मध्ये उत्तीर्ण प्रथम तीन क्रमांक अनुक्रमे विघ्नेश विजय तावडे, संदेश शामराव बिरादार , ईशा जयराम सावंत तर एच.एस.सी. कला व वाणिज्य शाखेतील विद्यार्थी अनुक्रमे सानिका चंद्रकांत घाडी, नरेश प्रकाश शिंगे , तुळशिदास संतोष पवार , स्नेहा भरत घाडी, हेमांगी संजय नेवरेकर , विघ्नेश राजेंद्र चव्हाण यांचा यावेळी भेटवस्तू , रोख रक्कम , पुष्पगुच्छ देऊन संस्था आणि विद्यालयामार्फत सत्कार करण्यात आला . शाळा समिती सदस्य , माजी पंचायत समिती सभापती दिलीप तळेकर , प्रविण वरूणकर , शरद वायंगणकर , दिनेश मुद्रस , संतोष जठार , निलेश सोरप , उमेश कदम यांचेमार्फत बक्षीसांसाठी रोख रक्कम पुरस्कृत करण्यात आली .
जे आपले ध्येय आहे ते सतत डोळ्यासमोर ठेवून वाटचाल केली तर यश हमखास मिळते, असे कार्यक्रमाचे अध्यक्ष अरविंद महाडीक म्हणाले . शाळा समिती सदस्य शरद वायंगणकर , अविनाश मांजरेकर यांनीही यशवंत विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका एस.एन.जाधव तर आभार प्राध्यापिका ए.बी. कानकेकर यांनी मानले

प्रतिक्रिया व्यक्त करा