You are currently viewing तुतारी एक्सप्रेसला नांदगाव येथे थांबा मिळावा

तुतारी एक्सप्रेसला नांदगाव येथे थांबा मिळावा

भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांची रेल्वे मंत्र्यांकडे मागणी

कणकवली

नांदगाव पंचक्रोशी आणि देवगड तालुक्यातील रेल्वे प्रवाशांची होणारी गैरसोय व मागणी लक्षात घेऊन 11003/11003 तुतारी एक्सप्रेसला कणकवली तालुक्यातील नांदगाव येथे थांबा मिळावा अशी मागणी केंद्रीय रेल्वे मंत्री ना.अश्विन वैष्णव यांचेकडे भाजपा सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी केली.

तसेच रेल्वे स्थानक प्लॅटफॉर्म वर पत्रा शेड नसल्यामुळे पावसात प्रवाशांना खूप त्रास होतो तरी सर्व स्थानकांवर पत्रा शेड करण्यात यावी त्यात कणकवली, कुडाळ, सावंतवाडी या प्रमुख रेल्वेस्थानकांना प्राधान्य देण्यात यावे अशीही मागणी तेलीभाजपा सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री ना.अश्विन वैष्णव यांच्याकडे केली

प्रतिक्रिया व्यक्त करा

15 − 7 =