ओटवणे मध्ये आढळले मेक्सिकन रेड इयर स्लाइडर जातीचे कासव
ओटवणे
ओटवणे रवळनाथ मंदिर नजिक मारुती मंदिर शेजारी ओहोळामध्ये आज दुपारी अमित वालावलकर ,अनंत तावडे या ग्रामस्थांना रेड इयर्स स्लायडर (red eared slider) जातीचे कासव नजरेस पडले ज्याच्यावर एक वेगळ्या प्रकारचे पट्टे असून तोंडाच्या ठिकाणी भगव्या रंगाचा पट्टा होता.
मात्र हे कासव ओटवण्यात कसे आले याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत हे कासव पाळण्यास भारतात पूर्णतः बंदी असून बऱ्याचदा हे पाळीव जातीचे कासव आहे हे कासव भारतातील नसून लाल कान असलेला स्लाइडर मूळचा दक्षिण युनायटेड स्टेट्स आणि उत्तर मेक्सिकोचा आहे, परंतु पाळीव प्राण्यांच्या सुटकेमुळे इतर ठिकाणी स्थापित झाला आहे आणि अनेक भागात तो आक्रमक झाला आहे जिथे तो मूळ प्रजातींना मागे टाकतो. लाल-कानाचा स्लाइडर जगातील 100 सर्वात आक्रमक प्रजातींच्या यादीमध्ये समाविष्ट आहे.
यामुळे कुणीतरी पाळीव कासव ओहोळात सोडून दिले असावे असा अंदाज आहे मात्र यामागे कासवाच्या तस्करीचा हात आहे का ?याबाबतही अभ्यास होणे गरजेचे आहे