You are currently viewing आजगावात मुलांना पंचांग वाचनाचे मार्गदर्शन

आजगावात मुलांना पंचांग वाचनाचे मार्गदर्शन

सावंतवाडी :

 

आजगाव येथे मुलांना भारतीय पंचांग वाचना संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यशाळेमध्ये इयत्ता पाचवी ते सातवीच्या एकूण १८ मुलांनी सहभाग घेतला. दाते पंचांगाच्या आधारे मुलांना शक, संवत्, तिथी,पक्ष, करण, नक्षत्र, ऋतू, भारतीय प्रमाण वेळ, सुर्योदय, सुर्यास्त आदी गोष्टी समजावून देण्यात आल्या. वरील गोष्टी तसेच सण, रितीरिवाज आदी बाबी पंचांगाच्या आधारे कसे शोधायचे हे शिकविण्यात आले. त्यांचा पंचांगाशी असलेला संबंध सांगितला. तसेच सर्व मुलांना दाते पंचांग भेट देण्यात आले.

या कार्यक्रमाचा खर्च आपल्या वडीलांच्या स्मरणार्थ सौदागर कुटुंबियांकडून करणेत आला. वडीलांच्या जन्म शताब्दीनिमित्त या वर्षी दर ३० तारखेला एक उपक्रम राबविण्यात येतो.

आगामी नववर्षातील संकष्ट चतुर्थी, एकादशी, गणेशोत्सव, दिवाळीतील विविध सण, धनिष्ठानवक आदी दिनविशेष मुलांनी पंचांगानुसार शोधून काढले.

प्रतिक्रिया व्यक्त करा