You are currently viewing मळेवाड येथे एसटी आणि डंपर यांच्यात अपघात…

मळेवाड येथे एसटी आणि डंपर यांच्यात अपघात…

सावंतवाडी

मळेवाड येथे एसटी आणि डंपर यांची एकमेकांना धडक बसून अपघात झाला. ही घटना आज सकाळी ७:०० वाजण्याच्या सुमारास घडली. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. मात्र दोन्ही गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यात दोन्ही गाड्यांच्या समोरील काचांचा चक्काचूर झाला. याबाबत सावंतवाडी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

घटनेची अधिक माहिती अशी की, संबंधित एसटी सावंतवाडी येथून आरोंदा मार्गे रेडीच्या दिशेने जात होती. यावेळी तिला डंपरची जोरदार धडक बसली. यात दोन्ही गाड्यांच्या समोरील काचांचा चक्काचूर झाला. तर इतरही मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही. दरम्यान या अपघाताची नोंद सावंतवाडी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा