You are currently viewing विद्यार्थ्यांसाठी मोफत वाचनालय

विद्यार्थ्यांसाठी मोफत वाचनालय

विद्यार्थ्यांसाठी मोफत वाचनालय

सिंधुदुर्गनगरी

 जिल्ह्यातील स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक  महत्वाची आणि प्रेरणादायी योजना राबविण्यात येत आहे. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र तथा मॉडेल करिअर सेंटर सिंधुदुर्ग यांच्यामार्फत सुरु करण्यात आलेल्या वाचनालयाचा जिल्ह्यातील इच्छुक विद्यार्थी आणि करिअरसाठी सज्ज होणाऱ्या युवकांनी  याचा  लाभ घेण्याचे आवाहन सहायक आयुक्त भै.गो. येरमे यांनी केले आहे.

 या वाचनालयामध्ये  UPSC, MPSC, पोलीस भरती, स्टाफ सिलेक्शन कमिशन,बँकिग अशा विविध स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असलेल्या दर्जेदार व उपयुकत पुस्तकांचा समावेश करण्यात आलेला आहे. ही सुविधा त्यांच्या अभ्यासात गती आणणारी आणि एकाच ठिकाणी सर्व संसाधनांची उपलब्धता देणारी आहे. विद्यार्थ्यांसाठी येथे एक शांत, प्रेरणादायी आणि अभ्यासासाठी अनुकूल वातावरण उपलब्ध असून सकाळी 10 ते सायं. 5 वाजेपर्यंत चालु असलेल्या या अभ्यासिकेचा लाभ घेणे ही एक सुवर्णसंधी ठरणार आहे. योग्य जागा, आवश्यक साहित्य आणि एकाग्रतेस पुरक वातावरण या ठिकाणी सहजपणे अनुभवता येते. 

            या सुविधेचा लाभ घेण्यासाठी  सहाय्यक आयुक्त भै.गो.येरमे यांनी विशेष आवाहन केले आहे. सर्व युवक व विद्यार्थ्यांनी अभ्यासासाठी या वाचनालयाचा पुरेपूर लाभ घ्यावा आणि आपली स्पर्धा परीक्षा तयारी अधिक बळकट करावी, शासनाच्या वतीने उपलब्ध करण्यात आलेल्या या सुविधा म्हणजे यशाकडे वाटचाल करण्याचे मजबूत पाऊल आहे.  योग्य मार्गदर्शन आणि दर्जेदार ग्रंथसंपदा हे यशाचे मूलभूत घटक असून ते आता एका ठिकाणी सहज उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घेऊन आपल्या सवप्नांकडे आत्माविश्वासाने वाटचाल करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

आधिक माहिती दूरध्वनी क्र. 02362228835, किंवा ई-मेल sindhudurgrojgar@gmail.com  वर संपर्क करावा.

प्रतिक्रिया व्यक्त करा