You are currently viewing कनेडी राडा प्रकरणातील आरोपींना पोलीस कोठडी…

कनेडी राडा प्रकरणातील आरोपींना पोलीस कोठडी…

३०७ मधील आरोपींना ९ फेब्रुवारी पर्यंत तर ३५३ मधील आरोपींना १० पर्यंत पोलीस कोठडी…

कणकवली

कनेडी येथील भाजप – शिवसेना राड्यातील संदेश उर्फ गोट्या सावंत यांच्या फिर्यादीवरून अटक केलेल्या ठाकरे शिवसेनेच्या तीन कार्यकर्त्यांना कणकवली न्यायालयात हजर करण्यात आले होते. दरम्यान त्या प्रकरणातील आरोपींना ९ फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

याप्रकरणी मंगेश रामचंद्र सावंत (वय ४८,भिरंवडे ), कुणाल विजय सावंत ( वय -३४, रा.सांगवे), योगेश रमाकांत वाळके ( वय ४२, रा.कनेडी), यांना २ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

तर पोलिस हवालदार राजेंद्र नानचे यांच्या तक्रारी वरून आयपीसी ३५३ मधील ४ आरोपींना कणकवली न्यायलयाने १० फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे. या प्रकरणी पोलिसांनी ५ दिवसांची पोलीस कोठडी मागितली पंरतु न्यायालयाने सुनावणी दरम्यान आरोपींना १० फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अनिल राजाराम पांगम ( वय ५८, सांगवे), संतोष वसंत आग्रे ( वय ४९, फोडांघाट ), संदीप बाळकृष्ण गावकर ( वय ३२, सांगवे ), तुषार श्यामसुंदर गावकर ( वय २९, सांगवे ) यांचा समावेश आहे.

कुंभवडे माजी सरपंच सूर्यकांत उर्फ आप्पा तावडे यांच्या तक्रारीवरून ३०७ कलमनुसार गुन्हा दाखल झालेल्या श्रीकांत नारायण सावंत (५०, भिरवंडे) , राजेश मधुकर पवार (५१, दिगवळे ), निखिल प्रकाश आचरेकर (३९, कणकवली) यांना ९ फेब्रुवारी पर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी दिली आहे. पोलिसांनी पाच दिवसाच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती.

*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘

*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*

🥜 *आमची उत्पादने*🥜

*🔹 शेंगदाणा तेल🔹 खोबरे तेल*
*🔹 तीळ तेल🔹 करडई तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप🔹देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*

🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒

*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*

*टीप :तुम्ही स्वतःकडचे धान्य (तेल बिया) आणि सुखे खोबरे आणून दिल्यास त्वरित घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*

*अधिक माहितीसाठी संपर्क*

*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*

*🌎 www.sunandaai.com*

*✉️ sunandaaikrushi@gmail.com*

*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*

 

प्रतिक्रिया व्यक्त करा