You are currently viewing १९ जुलैला कणकवलीत मोफत कृषी पुरक व्यवसाय मार्गदर्शन

१९ जुलैला कणकवलीत मोफत कृषी पुरक व्यवसाय मार्गदर्शन

कणकवली :

 

कणकवली येथील श्री पावणादेवी ॲग्रो प्रोड्युसर कंपनी यांच्यातर्फे कृषीपूरक व्यवसायाबाबत मार्गदर्शनाचे आयोजन मंगळवार १९ जुलैला सकाळी १०:३० वाजता भगवती मंगल कार्यालय येथे करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी मोफत आहे. कार्यक्रमात एमसीएल कंपनीचे नॅशनल सीनियर प्राईम संजय कामारे, वरिष्ठ सुधीर फडके व हर्षल हल्लारवाडकर मार्गदर्शन करणार आहेत. प्रत्येक गावात ग्रामउद्योग निर्माण करण्याचा कंपनीचा मानस असून त्यासाठीच कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शेतकरी बांधवांनी उपस्थित रहावे, असे आवाहन कंपनीतर्फे विनोद गोसावी , डी. डी. रासम (९८३३४९८९४४) यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा