You are currently viewing आमदार नितेश राणे यांचा शिवसेनेला वैभवाडीत धक्का

आमदार नितेश राणे यांचा शिवसेनेला वैभवाडीत धक्का

नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग दहा मध्ये उलथापालथ

शिवसेना महिला पदाधिकारी सुंदराबाई निकम यांच्यासह शिवसैनिकांनी केला भाजपात प्रवेश

कणकवली

वैभववाडी नगरपंचायत निवडणुकीत भाजपने शिवसेनेला धक्का दिला आहे. सेनेच्या महिला शहर पदाधिकारी सुंदराबाई निकम यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी आज आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत कमळ हाती घेतले आहे. आमदार नितेश राणे यांनी सर्व प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाक क्रमांक 10 मध्ये झालेली उलथापालथ ही महत्त्वपूर्ण ठरणार आहे. प्रवेश करणा-यामध्ये शिवसेनचे कार्यकर्ते दिवेश गजोबार, रणजित निकम, प्रसाद गजोबार, सुमित निकम, समीर गजोबार, अंकित गजोबार, दीपक धोंडू गजोबार यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांचा समावेश आहे. यावेळी भाजपा पक्ष निरीक्षक संदेश उर्फ गोटया सावंत, भाजपा तालुकाध्यक्ष नासीर काझी, बंड्या मांजरेकर, प्रकाश पाटील आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

13 − nine =