You are currently viewing दोडामार्गातील साटेली – भेडशीत कृषी विभागामार्फत यंत्राद्वारे भात लावणी प्रात्यक्षिक व शेतीशाळा संपन्न

दोडामार्गातील साटेली – भेडशीत कृषी विभागामार्फत यंत्राद्वारे भात लावणी प्रात्यक्षिक व शेतीशाळा संपन्न

दोडामार्ग :

 

दोडामार्ग तालुक्यातील साटेली – भेडशी येथे १७ जुलै रोजी भिकाजी गणपत्ये यांच्या शेतात कृषी विभागामार्फत यंत्राद्वारे भात लावणी प्रात्यक्षिक व शेतीशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी यंत्राद्वारे भात लावणी, (वाण – महाबली, वाडा – कोलम) प्रात्यक्षिक व शेतीशाळा वर्ग 3 आयोजित करण्यात आला होता. यावेळी, भात शेतातील पाणी व्यवस्थापन, SHC नुसार खतांचा संतुलित वापर, मॅट नर्सरी व्यवस्थापन, क्रोस्पट कीड रोग सल्ला व प्रकल्प, पीक विमा योजना प्रचार व प्रसिद्धी इत्यादी विषयांवर सविस्तर चर्चा व मार्गदर्शन करण्यात आले.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे शंका समाधान करण्यात आले. उपस्थित शेतकरी बांधवांनी या मार्गदर्शनाचा लाभ घेतला. यावेळी श्री. एन. एस. कोळी कृषीपर्यवेक्षक, श्री. जी. आर. वाघमारे कृषीसहाय्यक उसप, श्री. साईराम शिंदे कृषी सहाय्यक साटेली भेडशी व श्री. एस. एम. मघादे कृषी सेवक कोनाळ व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

9 + eleven =