You are currently viewing गोपुरी आश्रमाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त उद्या विशेष उपक्रमाचे नियोजन!

गोपुरी आश्रमाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त उद्या विशेष उपक्रमाचे नियोजन!

कणकवली :

कोकण गांधी आप्पासाहेब पटवर्धन यांच्या कार्याने जनमानसात एक वेगळी ओळख निर्माण केलेल्या गोपुरी आश्रमाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त गोपुरी आश्रम, वागदे येथे ‘चला करूया चिखलधुनी’ या खास उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या रविवार दि. १७ जुलै, २०२२ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी २.०० या कालावधीत हा खास उपक्रम राबविला जाणार आहे. या उपक्रमात कोणत्याही वयोगटातील इच्छुक सहभागी होऊ शकतील.

कोकणच्या पर्यटनाचा गोपुरी हा मानबिंदू. सध्या कृषी पर्यटनही खूप मोठ्या प्रमाणात होताना दिसतं. त्याच पार्श्वभूमीवर शेतीतील कामांसोबत निसर्गाचा आणि चिंब पावसाचा आस्वाद घेण्यासाठी ‘चला करूया चिखलधुनी’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी बाळू मेस्त्री – ९४२१६३३८१४ आणि बाबू राणे – ९४२३३३१४१९ या नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन गोपुरी आश्रम व्यवस्थापक मंडळामार्फत करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा