You are currently viewing वैभव नाईक यांच्यासारखा आमदार आम्हाला लाभला हे आमचे भाग्य..!

वैभव नाईक यांच्यासारखा आमदार आम्हाला लाभला हे आमचे भाग्य..!

शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया

मालवण शिवसेनेच्या माध्यमातून मालवणात विभागीय बैठकांचा धडाका

बैठकांना शिवसैनिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

आलेल्या विविध आमिषांना झुगारून आमदार वैभव नाईक शिवसेना पक्षाशी एकनिष्ठ राहिले. वैभव नाईक यांच्यासारखा आमदार आम्हाला मिळाला हे आमचे भाग्य आहे. अशा उत्स्फूर्त प्रतिक्रिया शिवसेना पदाधीकारी व शिवसैनिकांमधून उमटल्या. तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या पाठीशी ठाम असल्याचे शिवसैनिकांनी सांगितले. आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली मालवण शिवसेनेच्या माध्यमातून मालवण तालुक्यात जिल्हा परिषद मतदारसंघनिहाय विभागीय बैठकांचा धडाका लावण्यात आला आहे. यावेळी आ. वैभव नाईक यांनी शिवसैनिकांशी संवाद साधत शिवसेना पक्ष संघटना वाढीसंदर्भात मार्गदर्शन केले.

आज शनिवार १६ जुलै रोजी पेंडूर जि.प. मतदारसंघांची बैठक कट्टा येथे , पोईप जि.प. मतदारसंघांची बैठक पोईप ग्रा.प. येथे , व देवबाग जि.प. मतदारसंघांची बैठक नांदरुख व तारकर्ली येथे संपन्न झाली. या बैठकांना शिवसेना पदाधीकारी व शिवसैनिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला होता.

यावेळी आ. वैभव नाईक म्हणाले, शिवसैनिक शिवसेना पक्षाशी व पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्याशी ठाम राहिले आहेत.अशीच एकजूट कायम दाखवून येणाऱ्या निवडणुकांमध्ये शिवसेनेचा भगवा फडकवून आपली ताकद दाखवून द्यायची आहे. त्यासाठी आतापासूनच कामाला लागा. निवडणूका केव्हाही लागण्याची शक्यता आहे. गावागावात लोकांच्या समस्या जाणून घ्या. त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करा. पक्षाची संघटना अधिक मजबूत करण्यावर भर द्या. अशा सूचना आ.वैभव नाईक यांनी केल्या. शिवसेना मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी देखील शिवसैनिकांना यावेळी मार्गदर्शन केले.

याप्रसंगी पोईप येथे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, महिला उपजिल्हा संघटक सेजल परब,महिला तालुका समन्वयक पूनम चव्हाण, महिला तालुका प्रमुख श्वेता सावंत, विभाग प्रमुख विजय पालव, उपविभाग प्रमुख निलेश पुजारे, विभाग समन्वयक कृष्णा पाटकर, युवासेना उपजिल्हा प्रमुख पंकज वर्दम, युवासेना उपतालुका प्रमुख अमित भोगले, आशिष परब, मालवण सरपंच संघटना तालुकाप्रमुख नंदू गावडे, माजी सरपंच शिवराम पंत पालव, वायंगवडे सरपंच आनंद सावंत, वरली सरपंच आनंदी परब भाऊ चव्हाण आदी.
पेंडुर येथे उपतालुकाप्रमुख बाळ महाभोज, विभाग प्रमुख अण्णा गुराम, उपविभाग प्रमुख प्रसाद दळवी, उपविभाग प्रमुख पपी सावंत, बाबू टेंबूलकर, दर्शन म्हाडगुत,डॉ. सावंत, महिला विभाग प्रमुख लता खोत, विनोद सावंत, विष्णू लाड आदी.
देवबाग विभागातील नांदरुख येथे नांदरुख सरपंच दिनेश चव्हाण, विशाल धुरी, समीर पाटकर, सुहास राणे, कविता चव्हाण, अंजली घाडी, वृंदा चव्हाण, स्नीग्धा चव्हाण, महेश चोपडेकर, रामकृष्ण चव्हाण, विशाल भिसे आदी.
देवबाग विभागातील तारकर्ली येथे मा. नगरसेवक मंदार केणी, युवासेना शहरप्रमुख मंदार ओरसकर, प्रवीण रेवंडकर, महिला विभाग प्रमुख प्रियांका रेवंडकर, उपविभाग प्रमुख अनिल केळूसकर, विलास वालावलकर, शाखाप्रमुख राजू मेस्त्री, आबा केळूसकर, प्रसाद आडवणकर निलेश पणदूरकर, हरिश्चंद्र केळूसकर, सुजन खोबरेकर, वैष्णवी मेस्त्री, नंदू मेस्त्री, प्रभाकर राजम, सुप्रिया भोवर, सुप्रिया केळूसकर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा