You are currently viewing वेंगुर्ले येथे दिव्यांग तपासणी शिबिरात २५० जणांची तपासणी…

वेंगुर्ले येथे दिव्यांग तपासणी शिबिरात २५० जणांची तपासणी…

वेंगुर्ला

साहस प्रतिष्ठान सिंधुदुर्ग व इतर दिव्यांग संस्थांच्या मागणीनुसार जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग, जिल्हा समाजकल्याण व वेंगुर्ला पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने वेंगुर्ला ग्रामीण रुग्णालय येथे आयोजित करण्यात आलेल्या दिव्यांग तपासणी व ऑनलाइन सर्टिफिकेट शिबिरात २५० दिव्यांगांची तपासणी करण्यात आली.

शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी मुख्याधिकारी डॉ.अमितकुमार सोंडगे, पं. स.गटविकास अधिकारी उमा पाटील, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.अतुल मुळे, वैद्यकीय अधिकारी डॉ.गृहिता राव, साहस प्रतिष्ठान सिंधुदुर्ग च्या संस्थापक अध्यक्षा रुपाली पाटील, वेंगुर्ले इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा सौ. ज्योती देसाई, डॉ.पूजा कर्पे, बौद्धिक चाचणी तज्ज्ञ भाईप, फिजिओथेरपिस्ट योगिता शिंदे, डाटा एंट्री ऑपरेटर श्रीधर पवार, ज्योती मडकईकर, अस्मिना मकानदार, अस्मिता गावडे, शेखर माडकर, पी.एफ.डिसोझा, ग्रामिण रुग्णालय स्टाफ आदींसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी कणकवली उपजिल्हा रुग्णालयाचे ऑर्थोपेडिक डॉ.धनंजय रासम, नेत्रशल्य चिकित्सक डॉ.बाळासाहेब जोशी, कान, नाक, घसा तज्ञ डॉ.शाम राणे, मानसोपचार तज्ञ डॉ.रुपाली पाटील यांनी दिव्यांगांची तपासणी केली. या शिबिराचा उपयोग व दाखल्याचा लाभ वैश्विक ओळख पत्र मिळण्यासाठी, वेगवेगळ्या शासकीय योजनेसाठी, शैक्षणिक सुविधा मिळण्यासाठी तसेच दिव्यांग व्यक्तींना आत्मनिर्भर बनण्यासाठी होणार असून दिव्यांगांची संगणकीय प्रणालीद्वारे केंद्र सरकारकडे नोंदणी होऊन दिव्यांगांना स्वावलंबन कार्ड मिळणार आहे,असे साहस प्रतिष्ठानच्या संस्थापक रुपाली पाटील यांनी सांगितले. हे शिबीर यशस्वी करण्यासाठी पंचायत समिती, नगरपरिषद, ग्रामीण रुग्णालय व साहस प्रतिष्ठान सिंधुदुर्ग यांचे सहकार्य लाभले. यावेळी दिव्यांग बांधवांसाठी साहस प्रतिष्ठानच्यावतीने अल्पोपआहाराची व्यवस्था करण्यात आली होती.

प्रतिक्रिया व्यक्त करा

sixteen − six =