– निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांचे प्रांतांना पत्र
सिंधुदुर्गनगरी
शेतकरी बांधवांनी ई-पीक पाहणी ॲपव्दारे आपल्या शेतातील पिकांची नोंद आपणास स्वत: शेतात जाऊन करावयाची आहे. न केल्यास आपला 7/12 मधील पीक पेरा कोरा राहील यापुढे कोणतीही शासकीय मदत, पीकविमा, पीक कर्ज, अनुदान प्राप्त होणार नाही याची नोंद घ्यावी. याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे, असे पत्र विवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना पाठविले आहे.
ई-पीक पाहणी व्हर्जन 2 मध्ये UAT अंतर्गत आलेल्या काही मुद्दयांबाबत दुरुस्ती ची कार्यवाही सुरु आहे. डेटा साइन बाबत बदलांचे अनुषंगाने कार्यवाही सुरु आहे. खरीप हंगामाची पीक पाहणी 1 ऑगस्ट पासून सुरु होते. पीक विमायोजनेअंतर्गत नोंदणीची मुदत 31 जुलै आहे. या नोंदणीसाठी घोषणापत्र घेतले जाते. त्याकरिता पीक पाहणीचा 7/12 उतारा आवश्यक नाही. कृषी विभागाच्या 1 जुलै च्या शासन निर्णयामध्ये विम्यासाठी नोंदविलेले पीक व ई पीक पाहणी मध्ये नोंदविलेले पीक यामध्ये तफावत आढल्यास ई-पीक पाहणी मध्ये नोंदविलेले पीक ग्राह्य धरण्यात येईल असे नमूद केले आहे.
त्यामुळे क्षेत्रीय स्तरांवरील सर्व अधिकारी/ कर्मचारी यांनी शेतकऱ्यांना याबाबात मार्गदर्शन करावे. ई-पीक पाहणी ॲपव्दारे आपल्या शेतातील पिकांची नोंद शेतकऱ्यांना स्वत:शेतात जाऊन करावयाची आहे. न केल्यास आपला 7/12 मधील पिक पेरा कोरा राहील. यामुळे कोणतीही शासकीय मदत/ पिक विमा /पिक कर्ज/ अनुदान प्राप्त होणार नाही. याची नोंद घेणेबाबत आवश्यक त्या सूचना क्षेत्रीय स्तरावरील सर्व संबंधित अधिकारी कर्मचारी, मंडळ अधिकारी,तलाठी यांनी शेतकऱ्यांना आपले स्तरावर देण्याबाबत आपले स्तरांवरुन लेखी सूचना क्षेत्रीय स्तरावरील सर्व संबंधित अधिकारी/ कर्मचारी, मंडळ अधिकारी, तलाठी यांना निर्गमित कराव्यात. तसेच सर्व वृत्त पत्रात याबाबत आपले स्तरावरुन wide publicity देण्यात यावी. प्रत्येक ग्रामपंचायतीच्या वतीने गावोगाव दवंडी देऊन शेतकरी बांधवांना अवगत करावे. याबाबत केलेल्या कार्यवाहीचा अहवाल कार्यालयास सादर करावा.असे या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.