You are currently viewing दोडामार्ग तालुक्यातील शिवसैनिक एकसंघ, कोणताही पदाधिकारी अन्यत्र जाणार नाही : बाबुराव धुरी

दोडामार्ग तालुक्यातील शिवसैनिक एकसंघ, कोणताही पदाधिकारी अन्यत्र जाणार नाही : बाबुराव धुरी

नवीन पदाधिकारी नियुक्त्या ह्या जुन्या पदाधिकाऱ्यांना पदोन्नती देण्यासाठी

दोडामार्ग

दोडामार्ग तालुक्यातील शिवसैनिक हे एकसंघ असून ते बाळासाहेबांच्या विचारांचे आहेत, कोणीही कुठेही गेले तरी ते कधीच स्वार्थी राजकारण करणार नसून ते शिवसेनेसोबत कायम होते आणि राहातील, युवा व मूळ संघटनेतील काही कार्यकर्त्याना नवीन पदे दिलेली आहेत ही भविष्याचा विचार करून दिलेली असून जे जुने पदाधिकारी या पदावर होते त्यांना पदोन्नती देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे, त्यामुळे पद गेले म्हणजे तो कार्यकर्ता बदलला असा विचार कोणी करू नये व तसा प्रयत्न व गैरसमज कोणी पसरवू नये असा इशारा शिवसेना उपजिल्हा प्रमुख बाबुराव धुरी यांनी दिला आहे.

काही पदाधिकाऱ्यांच्या निवडी सध्या पक्ष नेतृत्वाकडून होत आहेत यात जुन्या पदाधिकाऱ्या बाबत उलट सुलट चर्चा होत असून या चर्चेला बाबुराव धुरी यांच्या या प्रतिक्रियेने पूर्णविराम मिळाला असून दोडामार्ग शिवसेना एकसंघ असल्याचे दिसत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा