You are currently viewing कबड्डी महर्षी स्व. शंकरराव उर्फ बुवा साळवी यांना आदरांजली

कबड्डी महर्षी स्व. शंकरराव उर्फ बुवा साळवी यांना आदरांजली

सावंतवाडी :

 

सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या माध्यमातून कबड्डी महर्षी स्व. शंकरराव उर्फ बुवा साळवी यांच्या जन्मदिनाचे व ‘कबड्डी दिना’चे औचित्य साधून स्व. बुवा साळवी यांना आदरांजली वाहण्यात आली. स्व. बुवा साळवी यांच्या कार्याचे धडे खेळाडूंना पटवून देऊन खेळासाठी प्रोत्साहन देण्यात आले. हा कार्यक्रम कळसुलकर हायस्कूलच्या हॉलमध्ये घेण्यात आला.

या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ पत्रकार वसंत उर्फ अण्णा केसरकर, कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष प्रसाद अरविंदेकर, शिवभवानी कला क्रीडा मंडळाचे कार्यकर्ते हनुमंत कार्वेकर, कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष नंदन वेंगुर्लेकर, कबड्डी असोसिएशनचे सदस्य जितेंद्र म्हापसेकर, एन. आय. एस. कोच दीनानाथ बांदेकर, कळसुलकर हायस्कूलचे क्रीडा शिक्षक केसरकर, त्याचप्रमाणे कळसुलकर हायस्कूलचे कबड्डी खेळाडू उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांकडून क्रीडा महर्षी शंकरराव उर्फ बुवा साळवी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

प्रतिक्रिया व्यक्त करा