You are currently viewing देशातील नागरिक सलग ३ तास स्मार्टफोन  व्यतित करीत आहेत !!

देशातील नागरिक सलग ३ तास स्मार्टफोन व्यतित करीत आहेत !!

 

नवी दिल्ली :

 

सध्याच्या काळात स्मार्ट फोन, स्मार्ट वॉच ही भारतीयांच्या जीवनाचा अविभाज्य घटक झाले आहेत. भारतीय स्मार्टफोनसाठी अगदी वेडे झाल्यासारखे दिसत आहे.भारतीय व्यक्ती रोज किमान ३ तास स्मार्ट फोनवर व्यतित करीत आहेत. एका सर्वेक्षणानूसार २०३० अखेरपर्यंत प्रत्येक भारतीय किमान १५ विविध स्मार्ट डिव्हाईसशी जोडलेला असेल, असा अंदाज व्यक्त होत आहे.

सर्वच स्मार्ट उपकरणांना वाढती मागणी पाहता.एका संस्थेने भारताच्या आठ मोठ्या शहरात स्मार्ट फोनच्या वापराबाबत सर्वेक्षण केले. सर्वेक्षणानूसार भारतीय लोक रोज किमान ३ तास स्मार्ट फोनवर वेळ व्यतित करतात, असे दिसून आले आहे. फक्त स्मार्ट फोनच नव्हे तर अन्य स्मार्ट उपकरणांचीही विक्री मोठ्या संख्येने वाढत आहे. वर्ष २०२० अखेरपर्यंत स्मार्ट फोनसह अन्य स्मार्ट उपकरणांचा बाजार सुमारे ३३ हजार ६५५ अब्ज रुपये इतका होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

विजुअल कॅपिटलिस्टने जागतिक ‘पर्सनल टेक मार्केट’चा अभ्यास करुन एक निष्कर्ष काढला आहे. अभ्यासानूसार स्मार्टफोन आॅपरेटिंग सिस्टमपासून अन्य उत्पादनांचा बाजारातील हिस्साबाबत माहिती दिली आहे. स्मार्टफोनचा वापर मोठ्या वेगाने वाढ असल्याचे म्हटले आहे. वर्ष २०२५ अखेरपर्यंत जगातील ७० टक्के लोकांकडे स्मार्टफोन असतील असा अंदाज व्यक्त केला आहे. स्मार्ट फोनच्या विक्रीत हुआवे व सॅमसंग यांची प्रत्येकी २० टक्के बाजारपेठ आहे. स्मार्ट फोन चालविण्यासाठी आवश्यक अँड्राईड पुरविण्यात गुगलचा दबदबा (सुमारे ७४ टक्के) आहे. अ‍ॅपलच्या आई ओ एस आॅपरेटिंग सिस्टिमचाही वाटा २४ टक्क्यांपर्यंत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा