You are currently viewing आम. वैभव नाईक यांनी ओरोस येथील थल सैनिक कॅम्पला  भेट देत दिल्या शुभेच्छा

आम. वैभव नाईक यांनी ओरोस येथील थल सैनिक कॅम्पला भेट देत दिल्या शुभेच्छा

सिंधुदुर्ग (ओरोस) :

५८ महाराष्ट्र बटालियन, एनसीसीच्या माध्यमातून ओरोस क्रीडासंकुल येथे आयोजित केलेल्या थल सैनिक कॅम्पला आमदार वैभव नाईक यांनी आज भेट दिली. यावेळी ५८ महाराष्ट्र बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल दीपक दयाल यांना आ. वैभव नाईक यांनी पुष्पगुच्छ देऊन कॅम्पला शुभेच्छा दिल्या. तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.१२ ते २१ जुलै या कालावधीत हा कॅम्प होत असून सिंधुदुर्ग,रत्नागिरी,सांगली, कोल्हापूर यांसह अन्य जिल्ह्यातील २९० विद्यार्थी या कॅम्पमध्ये सहभागी झाले आहेत.त्यांना सैनिकी प्रशिक्षण या १० दिवसीय कॅम्पमधून दिले जाणार आहे.

यावेळी सुभेदार मेजर दिनेश गेडाम,शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत,कुडाळ तालुकाप्रमख राजन नाईक, माजी उपसभापती जयभारत पालव, युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी ,संदीप म्हाडेश्वर,थर्ड ऑफिसर आनंद बांबणीकर, लेफ्टनेंट मल्लेश खोत,थर्ड ऑफिसर रविराज प्रधान, थर्ड ऑफिसर श्री.गुरव आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा