You are currently viewing रोटरी क्लब वतीने बांदा येथे मोफत सायकल वाटप

रोटरी क्लब वतीने बांदा येथे मोफत सायकल वाटप

सावंतवाडी (बांदा) :

 

गुरुपौर्णिमेच्या औचित्य साधून रोटरी क्लब ऑफ बांदातर्फे गरजू मुलींना मोफत सायकल वाटप करण्यात आले. हा कार्यक्रमात आनंदी मंगल कार्यालय सभागृहात संपन्न झाला. कार्यक्रमात दोन वेगवेगळ्या क्षेत्रातील गुरूंचा सत्कारही करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर बांदा सहाय्यक पोलीस निरीक्षक शामराव काळे, बँक ऑफ इंडिया बांदाचे शाखाप्रबंधक अंकित धवन, जी एस आर आनंद रासम, असिस्टंट गव्हर्नर रोटरियन नीता गोवेकर, सावंतवाडी रोटरी क्लबचे सेक्रेटरी प्रमोद भागवत, बांदा रोटरी क्लबचे प्रेसिडेंट मंदार कल्याणकर, व्हाईस प्रेसिडेंट प्रमोद कामत उपस्थित होते.

कार्यक्रमाचे इव्हेंट चेअरमन तुषार धामापुरकर होते. प्रास्तविक प्रेसिडेंट मंदार कल्याणकर यांनी केले. बांदा रोटरीचा अहवाल व भविष्यातील होणारे प्रकल्प याबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली. डीजी गौरीश धोंड व फर्स्ट लेडी प्रतिमा धोंड यांच्या संकल्पनेतून गर्ल्स पेडल पावर या प्रोजेक्टमधून दहा मुलींना सायकल देण्यात आल्या. यावेळी नीता गोवेकर, आनंद रासम यांनी मार्गदर्शन केले. सहाय्यक पोलीस निरीक्षक काळे व अंकित धवन यांनी आपले विचार मांडले. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने गणेश गर्दे व ज्येष्ठ मूर्तिकार सुरेश गुळेकर यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमास बांदा रोटरीचे सेक्रेटरी फिरोज खान, खजिनदार बाबा काणेकर, सुदन केसरकर, श्वेता कोरगावकर, सुधीर शिरसाट, प्रवीण शिरसाट, सिद्धेश पावसकर, आबा धारगळकर, स्वप्निल धामापूरकर, पिंटू गायतोंडे, मनसुख वासानी, डॉ. जगदीश पाटील, सचिन मुळीक, स्वागत नाटेकर, संदीप देसाई, शितल राऊळ, दिलीप कोरगावकर, सुनील राऊळ, संजय शिरोडकर, रत्नाकर आगलावे, शिवानंद भिडे, योगेश परुळेकर इत्यादी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवानंद भिडे तर आभार फिरोज खान यांनी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

thirteen + 14 =