You are currently viewing जिल्ह्यातील शाळा बंद करण्याच्या निर्णयाला ठाकरे शिवसेनेचा विरोध…

जिल्ह्यातील शाळा बंद करण्याच्या निर्णयाला ठाकरे शिवसेनेचा विरोध…

जिल्ह्यातील शाळा बंद करण्याच्या निर्णयाला ठाकरे शिवसेनेचा विरोध…

प्रांताधिकाऱ्यांना निवेदन सादर; पसंती शिक्षण मंत्र्यांशी चर्चा करणार, आमदार महेश सावंत…

सावंतवाडी

जिल्ह्यातील अनेक शाळा बंद करण्याच्या निर्णयाला ठाकरे शिवसेनेने तीव्र विरोध दर्शवला आहे. आज ठाकरे गटाचे आमदार महेश सावंत यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री यांना निवेदन देण्यासाठी उपविभागीय दंडाधिकारी हेमंत निकम यांच्याकडे निवेदन सादर करून हा निर्णय रद्द करण्याची मागणी केली आहे.

माहीम मुंबईचे ठाकरे शिवसेनेचे आमदार महेश सावंत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे विधानसभा प्रमुख रूपेश राऊळ, जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांनी निवेदन दिले. यावेळी तालुकाप्रमुख मायकल डिसोझा, दोडामार्ग तालुकाप्रमुख संजय गवस, उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार, अशोक परब, शब्बीर मणीयार, शिवदत्त घोगळे, समिरा खलील, नामदेव नाईक, बाळु गवस आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.

१५ मार्च २०२४ च्या शासन निर्णयानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ला या भागातील अनेक शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होणार असून, अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. तसेच तीन तालुक्यांतील भौगोलिक परिस्थिती डोंगराळ आहे ते विचारात न घेता हा निर्णय घेण्यात आला आहे. शिवसेनेने या निर्णयाला चुकीचा आणि विद्यार्थ्यांवर अन्याय करणारा असल्याचे म्हटले आहे. तसेच या निर्णयामुळे सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण समन्वय समितीने अभ्यासपूर्ण शासन निर्णय रद्द करण्याची मागणी केली आहे. या शासन निर्णयाला विरोध करण्यासाठी ठाकरे सेनेने उपविभागीय दंडाधिकाऱ्यांना निवेदन सादर करून १५ मार्च २०२४ ला शासन निर्णय रद्द करण्याची मागणी केली आहे. प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे :-१५ मार्च २०२४ ला शासन निर्णय रद्द करावा, आर.टी.ई. ऍक्टच्या शेड्युलमध्ये नमूद केल्याप्रमाणे सर्व संच मान्यता करावी, सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण संस्था चालक मंडळ सुचविलेली आर.टी.ई. ऍक्ट.च्या शेड्युलप्रमाणे योजना शासनाच्या व विद्यार्थ्यांच्या हिताच्या असल्यामुळे त्वरित अमलात आणावी, अशी मागणी केली आहे.

आमदार महेश सावंत म्हणाले, डोंगराळ भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहेत. मी शिक्षणमंत्री यांची भेट घेऊन या विषयावर चर्चा करणार आहे. तसेच येणाऱ्या अधिवेशनात विषय मांडला जाईल. विधानसभा प्रमुख रूपेश राऊळ म्हणाले, नदी, नाले, डोंगराळ भाग असल्याने शाळा व माध्यमिक विद्यालय निर्माण झाली होती तीच साखळी मोडीत काढून गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा हा प्रयत्न हाणून पाडला पाहिजे. तर जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांनी ग्रामीण आणि डोंगराळ भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणाऱ्या निर्णयाला विरोध राहील. त्यामुळे गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न हाणून पाडला पाहिजे.

प्रतिक्रिया व्यक्त करा