You are currently viewing ध्वनी प्रदूषण मर्यादा निश्चित असताना डीजेला बंदी का ?

ध्वनी प्रदूषण मर्यादा निश्चित असताना डीजेला बंदी का ?

मुंबई :

 

ध्वनी प्रदूषणावर मर्यादा निश्चित केलेली असताना डीजे वाद्यावर कायमची बंदी का? असा सवाल उच्च न्यायालयाने उपस्थित केला. राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने डीजे व कर्णकर्कश वाद्यांवर घातलेल्या बंदी विरोधात दाखल याचिकेवर न्यायमूर्ती दिपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठाने असा सवाल उपस्थित केला. तसेच राज्य सरकारला २ ऑगस्टपर्यंत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले आहेत. डीजेच्या आवाजाची पातळी धडकी भरवणारी आणि ध्वनी प्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन करणारी गणपती विसर्जनाच्या मिरवणुका व अन्य उत्सवात डीजे व डॉल्बी सिस्टीमसारख्या वाद्यांवर घातलेली बंदी आणि त्या संदर्भात पोलीस करीत असलेल्या कारवाई विरोधात प्रोफेशनल ऑडिओ आणि लाइटनिंग असोसिएशनने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा