You are currently viewing आरोंदा येथे विजेचा लपंडाव

आरोंदा येथे विजेचा लपंडाव

सावंतवाडी :

 

आरोंदा मध्ये अधून मधुन गेले ५ ते ६ दिवस वारंनवार वीजेचा खेळ खंडोबा चालु आहे. ऐन पावसाळ्यात हा वीजेचा खेळखंडोबा चालु असल्याने वीजेची उपकरणे जळण्याची शक्यता ही नाकारता येत नाही. तर काही विभागातील पथदीप ही पेटत नसल्याने तेथील नागरिकांना संध्याकाळच्या वेळी बाहेर फिरणे कठीण बनले आहे. त्यामूळे संबंधित खात्यांनी यात लवकरात लवकर लक्ष घालून व्यवस्थित वीज पुरवठा चालू करावा व पेटत नसलेले पथदीप ही चालू करावेत. आमची होणारी गैरसोय टाळावी अशी मागणी आरोंदा मधील नागरीकांमधून मोठ्या प्रमाणात होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा