*’भावरंग बालमनाचे’ बालगाणी काव्यसंग्रहाचे प्रकाशन संपन्न-*
*जिल्हा परिषद शाळेतील मुलांच्या कवितांचे भावविश्व-*
प्रतिनिधी:-
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र,जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था पुणे डाएट आयोजित इयत्ता पहिली नविन अभ्यासक्रम प्रशिक्षण अंतर्गत जिल्हास्तरीय शिक्षक प्रशिक्षण सिंहगड इन्स्टिट्यूट skn कुसगाव लोणावळा ता:- मावळ पुणे येथे पार पडले .या कालवधीत शिक्षक प्रशिक्षणार्थी कवी संपादक यशवंत घोडे जुन्नर जि. प.शाळा कुमशेत यांच्या “भावरंग बालमनाचे” बालगाणी बालकाव्यसंग्रहाचे प्रकाशन पुणे जिल्हा माध्यमिकशिक्षणाधिकारी भाऊसाहेब कारेकर,पुणे डाएटचे प्राचार्य नामदेव शेंडकर पुणे, डाएटचे वरिष्ठ अधिव्याख्याता बाळकृष्ण वाटेकर यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी तज्ञ मार्गदर्शक वैशाली गाढवे,मनिषा कुऱ्हाडे, दिव्या भोसले,नितिन मेमाने, हनुमंत जाधव,तसेच पुणे जिल्ह्या तील सर्व तालुक्यातील तज्ञ मार्गदर्शक शिक्षक,प्रशिक्षणार्थी शिक्षक उपस्थित होते.सर्वांनी कौतुक केले व शुभेच्छा दिल्या .
हा काव्यसंग्रह कवी संपादक यशवंत घोडे यांनी संपादीत केला असून त्यांच्या जि.प.प्राथ.शाळा कुमशेत तालुका जुन्नर येथील इयत्ता १ली ते इ. ४ थी च्या विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या स्वरचित कविता आहे .
विद्यार्थ्याच्या नवनिर्मितीला चालना देणाऱ्या आहेत. विद्यार्थ्यांनी त्यांच्या मनातले भाव काव्यरूपी रेखाटले आहेत. कवी घोडे यांचे ४ काव्यसंग्रह प्रकाशित असून तसेच पहिली ते तिसरी वर्गासाठी त्यांचा” अवतीभवती” हा बालकाव्यसंग्रह समग्र शिक्षा अभियान ग्रंथालय निर्मिती अंतर्गत राज्यशैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र SCERT यांनी प्रकाशित केला असून ,महाराष्ट्र राज्यातील शासकीय’ अनुदानित व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व शाळां मध्ये ग्रंथालयात पोहचत आहे . तसेच शिवजन्मभूमी जुन्नरयेथील पाठयपुस्तक कवी साहित्यिक उत्तम सदाकाळ यांची प्रस्तावना काव्यसंग्रहाला लाभली आहे . बालभारती पाठयपुस्तक संपादन मंडळ माजी सदस्य श्रीकांत चौगुले प्रेरणादायी शुभेच्छा संदेश दिला आहे.या पुस्तकाच्या निर्मिती साठी अनमोल मार्गदर्शन प्रा राजेंद्र सोनवणे यांचे लाभले आहे.सुप्रसिद्ध चित्रकार सुहास जगताप यांनी उत्कृष्ट चित्र रेखाटन केले आहे. साईराजे पब्लिकेशन पुणेचे प्रकाशक नक्षत्राचं देणं काव्यमंचचे राष्ट्रीय अध्यक्ष कवी वादळकार यांनी विद्यार्थ्यांना प्रेरित केले. “भावरंग बालमनाचे “बालगाणी बालकाव्यसंग्रह बाल साहित्यिकांना भविष्यात नवी दिशा देणारा प्रेरणास्थान आहे.अशी भावना मान्यवरांनी व्यक्त केली.
______________________________
*संवाद मीडिया*
*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘
*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*
🥜 *आमची उत्पादने*🥜
*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल🔹काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप🔹देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध🔹मधातला आवळा*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹
🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒
*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ🔸गावठी सुरय तांदूळ*
*🔸घावण पीठ/थालीपीठ🔸*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ🔸कडवे वाल*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन🔸पेणचे पांढरे कांदे माळ*
*🔸 मालवणी मसाला🔸खडा मसाला*
*🔸 भिमसेनी कापुर🔸मकाना🔸काजुगर*
*🔸 इतर कृषी उत्पादने*
*टीप :तुम्ही स्वतःकडचे सुखे खोबरे आणून दिल्यास घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*
*अधिक माहितीसाठी संपर्क*
*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*
*🌎 www.sunandaai.com*
*✉️ sunandaaikrushi@gmail.com*
*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*
*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/108455/
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*