You are currently viewing वैभववाडी शहरात सुरू असलेले अवैध बंद करा : अन्यथा आंदोलन.

वैभववाडी शहरात सुरू असलेले अवैध बंद करा : अन्यथा आंदोलन.

मनसेच्या वतीने पोलिस ठाण्यात निवेदन.

वैभववाडी 
वैभववाडी शहरात राजरोसपणे सुरू असलेले अवैध धंदे बंद करा. या मागणीचे निवेदन वैभववाडी मनसेच्यावतीने पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले आहे. वैभववाडीत घराघरात मटका केंद्र सुरू झाले आहे. गोवा बनावटीची दारू विकली जात आहे. युवा पिढीला बरबाद करणारा गांजा इथे विकला जात आहे. मटका व गुटख्याचे मोठ्या प्रमाणात लाभार्थी शासकीय कर्मचारी आहेत. हे तालुक्याचे दुर्भाग्य आहे. हे सर्व धंदे तात्काळ बंद करा. अन्यथा मनसे सरचिटणीस, माजी आ. परशुराम उपरकर यांच्या नेतृत्वाखाली डीवायएसपी कार्यालय याठिकाणी धडक मोर्चा काढण्याचा इशारा मनसेने निवेदनातून दिला आहे. निवेदन देतेवेळी तालुकाध्यक्ष सचिन तावडे, चंद्रशेखर सावंत, दीपक पार्टे, रुपेश वारंग, दिनकर डाफळे, विनोद विटेकर, संतोष आमरसकर, चंद्रकांत पार्टे, अजय शिंदे, सौरभ चोचे, दीपक मांजलकर व अनिकेत वीर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा