You are currently viewing श्री सद्गुरू राऊळ महाराज मठ, मुलुंड(पूर्व) येथे गुरूपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात झाला साजरा.!

श्री सद्गुरू राऊळ महाराज मठ, मुलुंड(पूर्व) येथे गुरूपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात झाला साजरा.!

मुंबई

जीवनात नेहमीच अनेक संकटे येत असतात त्यामुळे खचून जाऊ नका ही संकट सुसंधी घेऊन आलेली आहेत असे समजून अधिक जोमाने गुरूवर विश्वास, निष्ठा पक्की असल्यास घाबरायचे नाही.आपण सत्कर्म सदाचारच्या मार्गाने मार्गस्थ व्हावा आणि सुखदुःखाना सामोरे जाण्याचा प्रयत्न करा ! जगाचं कल्याण लोक सेवेमध्ये आहे असे प .पू सद्गुरू राऊळ महाराज दत्तप्रसाद भक्त मंडळ मुलुंडचे कार्याध्यक्ष प .पू सद्गुरू गुरूदास माऊली सारंग महाराज यांनी ‘जीवनात गुरूची आवश्यकता का ?’ याविषयी ३८व्या गुरुपौर्णिमेच्या उत्सव सोहळ्यात भक्तांना मार्गदर्शन करताना प्रतिपादन केले. प्रारंभी प पू सद्गुरू राऊळ महाराज, प पू सद्गुरू अण्णा महाराजांच्या मूर्तीचं पूजन करण्यात आले. तद्वत प.पू सद्गुरू गुरूदास माऊली सारंग महाराज यांची पाद्यपूजा प्रभाकर दळवी, पल्लवी दळवी या दाम्पत्याच्या हस्ते करण्यात आली. प पू . सद्गुरू गुरूदास माऊली सारंग महाराज पुढे म्हणाले की , सद्गुरू केल्याशिवाय जीवनात डोळसपणा येत नाही.त्यासाठी पुण्याईचा दिवा सतत तेवत ठेवावा लागतो. तुम्ही नामस्मरण रहा आणि स्वतःला वेळ द्या ! त्यानंतर परमेश्वर एका क्षणात भेटू शकतो असे सूचित करून ‘ तुला राऊळनाथा कसा बरा विसरू ,तुला अण्णा बाबा कसा विसरू या गायनाने भक्तांना मंत्रमुग्ध केले. श्रींची महाआरती अखंड महाप्रसाद , सुश्राव्य भजन आदी कार्यक्रमासोबत गुरू चरित्र, दासबोध ग्रंथाच्या माध्यमातून प्रवचन आणि पुढील प्रबोधन करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

six + sixteen =