You are currently viewing १६ जुलैला माजगांव येथील सिध्दीविनायक हॉल मध्ये गणेशमूर्ती रंगकाम, रेखणी कार्यशाळा व प्रात्यक्षिकाचे आयोजन

१६ जुलैला माजगांव येथील सिध्दीविनायक हॉल मध्ये गणेशमूर्ती रंगकाम, रेखणी कार्यशाळा व प्रात्यक्षिकाचे आयोजन

सावंतवाडी :

 

सिंधुदुर्ग जिल्हा बँक,श्री गणेश मूर्तीकार संघ सिंधुदुर्ग व भगीरथ प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने यावर्षी २०२२ साठी जिल्हास्तरीय पर्यावरणपुरक गणेश मूर्तीचे आयोजन कुडाळ येथे १५ ते १७ जुलै २०२२ दरम्यान आयोजीत करण्यात आले होते. परंतु मूर्तीकारांच्या विनंती नंतर पुढे ढकलण्यात आले असुन स्पर्धेची तारीख नंतर जाहीर करण्यात येणार आहे. दरम्यान १६ जुलै २०२२ रोजी माजगांव येथील सिध्दीविनायक हॉल मध्ये दुपारी २.३०ते ५.३० या वेळेत गणेशमूर्ती रंगकाम व रेखणी कार्यशाळा व प्रात्यक्षिकाचे आयोजन जिल्ह्यातील मूर्तीकारांसाठी करण्यात आले आहे.

मंगलमूर्ती गणेशामध्ये रंगसंगती व रेखणी यांचे महत्व आहे. पर्यावरणपूरक रंग हि काळाची गरज आहे. या संबधीचे मार्गदर्शन व प्रात्यक्षिक कँमल कंपनीच्या मार्गदर्शना खाली होणार आहे. या मार्गदर्शन कार्येक्रमास जिल्ह्यातील सर्व मूर्तीकार बांधवांनी वेळेत उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी केले आहे. सदर कार्यशाळेचे आयोजन भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान व कँमल कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात येणार आहे. या कार्यशाळा संबंधित अधिक माहितीसाठी नविन मालवणकर मोबा. नं. ८८०६३४५४८८ संपर्क साधावा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

nineteen − 9 =