You are currently viewing “स्ट्रक्चर”ला धोका न पोहोचवता मोती तलावाची साफसफाई करणार…

“स्ट्रक्चर”ला धोका न पोहोचवता मोती तलावाची साफसफाई करणार…

नागरीकांच्या बैठकीत निर्णय; राजघराण्याचे सहकार्य मिळेल, लखम राजे…

सावंतवाडी

“स्ट्रक्चर” ला कोणताही धोका न पोहोचवता सावंतवाडी मोती तलावाची साफसफाई करण्याचा निर्णय आज येथे आयोजित बैठकीत घेण्यात आला. पावसाळ्यापुर्वी ही मोहीम राबविण्यात यावी, त्यासाठी सर्व नागरिकांनी सहकार्य करावे, असा सुर या ठीकाणी व्यक्त करण्यात आला. दरम्यान पाणी हे सर्वासाठी महत्वाचे आहे. त्यामुळे राजघराण्याकडून आवश्यक असलेले सर्व सहकार्य केले जाईल, असे आश्वासन सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले यांनी दिले. मोती तलावाची साफसफाई करण्यासाठी आज येथे आयोजित बैठकीत सकारात्मक चर्चा करण्यात आली.

यावेळी माजी राज्यमंत्री तथा आमदार दीपक केसरकर, मुख्याधिकारी जयंत जावडेकर, तहसीलदार राजाराम म्हात्रे, माजी नगराध्यक्ष संजू परब, माजी उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर, माजी नगरसेवक बाबू कुडतरक, आनंद नेवगी, अनारोजीन लोबो, मनोज नाईक, सुधीर आडिवरेकर, सुरेंद्र बांदेकर, शुभांगी सुकी, माधुरी वाडकर, भारती मोरे, राजू बेग, दिपाली भालेकर, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, देवा टेमकर, समीर वंजारी, अमेय तेंडुलकर, राघवेंद्र नार्वेकर, अजय गोंदावळे, बंटी राजपुरोहित, निरज देसाई, अभिषेक सावंत, दाजी राऊळ, विनोद सावंत, परिक्षित मांजरेकर, संजू शिरोडकर, सतिश बागवे, बाबुराव धुरी आदिंसह मोठ्या संख्येने शहरातील प्रतिष्ठित नागरी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

17 − thirteen =