You are currently viewing तुमच्या मुळे गुरुजी

तुमच्या मुळे गुरुजी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखक कवी रामदास अण्णा यांची अप्रतिम काव्यरचना*

*तुमच्या मुळे गुरुजी*

तिन्ही जग नमती जिथे, ते स्थान पहिले गुरू।
ज्यांच्या छत्र छायेत, झाले जीवन सुरू।

बोबडे बोबडे बोलता, शिकलो बोलणे सारे।
तिच्याच सोबत राहून मी, शिकलो संस्कार खरे।

बालवाडी मी नाही पाहिली, गेलो पहिल्या वर्गात।
निश्चिंतेच्या जीवनात, मग शिक्षण आले मार्गात।।

पाटी पुस्तक दप्तर घेऊन, शिक्षण झाले सुरू।
शाळेत प्रवेश घेतला तेव्हा, कळले आम्हा गुरू।।

पहिली ते चौथीचे, शिक्षक नाही लक्षात।
तेच ब्रम्हा विष्णु सदाशिव, आले समोर साक्षात।।

पाचवी ते आठवी , मास्टर होते भारी।
एका चुकीचे दोन फटके, अशी रितच त्यांची न्यारी।।

नववी दहावी शिकण्यासाठी, गेलो गावी किन्ही।
ब्रम्हा विष्णू सदाशिव, गुरू मिळाले तिन्ही।।

होस्टेलमध्ये शिकलो तेव्हा, घरचे न्हवते कोणी।
प्रेम केले लेकरांपरी, जपले संबंध दोन्ही।।

आम्हाला कधी खूप मारले, केले आमचे रक्षण।
कठोर त्यांचा न्यायदण्ड आणी, कठोर त्यांचे शिक्षण।।

जीवनात मला जर तुम्ही, शिक्षक भेटले नसते।
जीवन निरर्थक होऊन, असेच गेले असते।।

तुम्हाला मी काय देऊ, कसे फेडू उपकार।
तुमच्या समोर बसून, जिवन झाले साकार।।

जीवनी सारे बंध वेगळे, एक शिष्य एक गुरू।
अंधारातून प्रकाशाकडे, जीवन होते सुरू।।

गुरुकृपा झाली तेंव्हा, देवा देवपण आले।
गुरूच्या आशीर्वादाने, जिवन सफल झाले।।

तुमच्या चरणी आम्ही, विद्यार्थी करतो वंदन।
आमची सारी सफलता, ते गुरुजींचे अभिनंदन।।

माझे सारे श्रेय तुम्हाला, जीवनात मला जे मिळते।
तुमच्या चरणी गुरुजी, सहजपणे कर जुळते।।

श्री रामदास आण्णा
गाव तीर्थक्षेत्र श्री चक्रधर स्वामी मंदिर मासरुळ
©® चे सर्व अधिकार आरक्षित आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 × 2 =