You are currently viewing वैभववाडी महाविद्यालयात ‘जागतिक लोकसंख्या दिन’ साजरा

वैभववाडी महाविद्यालयात ‘जागतिक लोकसंख्या दिन’ साजरा

वैभववाडी

वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था मुंबई संचलित आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात सामाजिक शास्त्र विभागाच्यावतीने
दिनांक 11 जुलै जागतिक लोकसंख्या दिन प्राचार्य डॉ.सी.एस‌.काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.ए.एम. कांबळे, प्रमुख मार्गदर्शक प्रा. एस. आर. राजे, सामाजिक शास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ.आर.एम.गुलदे, इतिहास विभाग प्रमुख प्रा.एस.एन. पाटील, कॉमर्स विभाग प्रमुख प्रा.डॉ.एम.आय.कुंभार उपस्थित होते.
जागतिक लोकसंख्या दिन कार्यक्रमाच्या माध्यमातून वाढत्या लोकसंख्येचे होणारे दुष्परिणाम आणि सद्यःस्थिती याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण व्हावी या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याचे प्रास्ताविकात प्रा.डॉ.गुलदे यांनी सांगितले. भारतीय लोकसंख्या धोरण या विषयावर प्रा. एस. आर. राजे यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी पंचवार्षिक योजनांमध्ये लोकसंख्या नियंत्रणासाठी सरकारने केलेल्या प्रयत्नांवर सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच प्रा.एस. एन.पाटील यांनी विद्यार्थ्यांचे उद्बोधन करताना सांगितले की, विद्यार्थ्यांनी समाजात जाऊन जनजागृती करण्याची गरज आहे. क.श्रुती खाडे व कु.सानिका मुद्रस (एफ वाय बी कॉम) या विद्यार्थिनींनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे अध्यक्ष उपप्राचार्य प्रा.ए.एम. कांबळे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले‌. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील विद्यार्थी तसेच प्रा.डॉ.एन.व्ही.गवळी, प्रा.डॉ.डी.एम सिरसट, प्रा.संजीवनी पाटील व प्रा.व्ही. व्ही.शिंदे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा.डॉ.आर.एम. गुलदे यांनी केले तर आभार प्रा.आर.बी.पाटील यांनी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा