माजी खासदार डॉ. निलेश राणे व भाजप भटके विमुक्त आघाडी जिल्हाध्यक्ष नवलराज काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत नियुक्तीपत्र प्रधान
मालवण-
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सामाजिक कार्यात सक्रिय असणारे कणकवली तालुक्यातील श्री किरण चव्हाण यांची भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त आघाडीच्या सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा अध्यक्षपदी निवड करण्यात आली. किरण चव्हाण हे गेले अनेक वर्ष बेलदार समाज संघटनेचे पदाधिकारी आहेत. त्यांनी दोन वर्ष बेलदार भटका समाज संघटनेच्या सिंधुदुर्ग जिल्हा सरचिटणीस पदाची तर विद्यमान जिल्हा अध्यक्ष पदाची दोन वर्ष यशस्वी धुरा सांभाळली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात नव्याने स्थापन झालेल्या भटके विमुक्त जाती व जमाती कृती समिती सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष पदाची धुरा देखील ते सध्या सांभाळत आहेत. भाजप भटके विमुक्त आघाडी सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी श्री नवलराज काळे यांची निवड झाल्यानंतर काळे यांनी संपूर्ण जिल्हा पिंजून काढत भटके विमुक्त आघाडीमध्ये येणाऱ्या सर्व जाती जमातींना एकत्र करण्याचे काम केले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजप भटके विमुक्त आघाडीच्या संघटनात्मक बांधणी करण्याच्या चळवळीत चव्हाण यांच्या रूपाने बेलदार समाजाचे नेतृत्व काळे यांनी हेरल व त्या नेतृत्वाला भारतीय जनता पार्टीत काम करण्यासाठी सक्रिय केले. भटके विमुक्त आघाडीचे राज्य उपाध्यक्ष तथा कोकण प्रभारी गोविंद गुंजाळकर व कोकण विभागीय अध्यक्ष राम इदाते यांच्याशी चर्चा करून किरण चव्हाण यांच्या नावाची सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा अध्यक्ष पदासाठी शिफारस केली. त्यानुसार गोविंद गुंजाळकर व राम इदाते यांनी भटके मुक्त आघाडी भाजप प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या मान्यतेनुसार श्री नवलराज काळे यांच्याकडे नियुक्तीपत्र पाठवून 11 जुलै 2022 रोजी मालवण येथे सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार तथा भाजप नेते डॉ निलेश राणे व भाजप भटके विमुक्त आघाडी सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष नवलराज काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत नियुक्त पत्र देऊन ही निवड जाहीर करण्यात आली. या निवडी बाबत श्री काळे यांना बेलदार समाजाचे ज्येष्ठ नेते श्री वसंत जाधव (सावंतवाडी) व वैभववाडी भाजप भटके विमुक्त आघाडीचे तालुकाध्यक्ष मारुती मोहिते यांचे मोलाचे सहकार्य मिळाले. श्री चव्हाण यांच्या निवडीमुळे रत्नागिरी सहित सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संघटन बांधणी करिता मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. किरण चव्हाण यांचे निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.