युवा संदेश प्रतिष्ठान आयोजित सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षा STS – २०२५ परीक्षेला प्रतिसाद
कणकवली :
रविवार २ फेब्रुवारी रोजी आयोजित STS परीक्षेचे उद्घाटन मुख्य परीक्षा केंद्र ज्ञानदा शिक्षण संस्था संचालित आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स वरवडे मध्ये संपन्न झाला.
यावेळी ज्ञानदा शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष बुलंद पटेल, गटशिक्षणाधिकारी कैलास राऊत, आयडियलच्या मुख्याध्यापिका अर्चना देसाई, शिक्षक नेते गिल्बर्ट फर्नांडीस, संतोष जाधव, विनायक जाधव, आनंद तांबे किशोर कदम, सुहास सावंत, महेंद्र पवार, संदीप तांबे, प्रमोद पवार, परीक्षा प्रमुख सुशांत मर्गज आदी मान्यवर आणि शिक्षक प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


हे परिक्षेचे ८ वे वर्ष असून सिधुदुर्ग जिल्ह्यात ३० परीक्षा केंद्रावर ही परीक्षा संपन्न झाली. सिंधुदुर्ग जिल्हातून १२,४६७ विद्यार्थ्यानी परीक्षा दिली. प्रत्येक इयत्तेतील पाहिल्या ५० अशा २५० गुणवंत विद्यार्थ्यांना अडीच लाख रुपयांची रोख बक्षिसे सन्मानचिन्ह, मेडेल व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच ४ थी, ६ वी व ७ वी या प्रत्येक इयत्तेतील प्रथम पाच गुणवंत विद्यार्थ्यांना विमानाने भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) या संस्थेला व २ री, ३री, च्या टॉप फाईव विद्यार्थ्याना गोवा येथील सायन्स सेंटर ला भेटी साठी घेऊन जाण्यात येणार आहे. या परीक्षेचे मुख्य परीक्षा केंद्रे आयडीयल इंग्लिश स्कूल वरवडे, कणकवली येथे असून इतर परीक्षा केंद्र खालीलप्रमाणे कनेडी हायस्कूल, सांगवे, फोंडा हायस्कूल, जि. प. शाळा खारेपाटण न. १, वामनराव महाडिक विद्यालय, तळेरे, शिरगाव हायस्कूल शाळा जामसंडे न १, देवगड, शाळा कुणकेश्वर न १, देवगड, पडेल हायस्कूल, रामगड हायस्कूल, आचरा हायस्कूल टोपीवाला हायस्कूल, मालवण, वराडकर हायस्कूल कट्टा, जि. प. शाळा कुडाळ पडतेवाडी, नाथ पै इंग्लिश स्कूल, बिबवणे हायस्कूल, पणदूर हायस्कूल, प्राथमिक शाळा कुडाळ कुंभारवाडा, न्यू इंग्लिश स्कूल कसाल, वासुदेवानंद सरस्वती विद्यालय माणगाव, हायस्कूल, सावंतवाडी, सैनिक स्कूल, आंबोली, शाळा माडखोल न. १, शाळा मळेवाड न.१, खेमराज हायस्कूल बांदा, कलंबिस्त हायस्कूल सांगेली, मळगाव इंग्लिश स्कूल मळगाव, न्यू इंग्लिश स्कूल दोडामार्ग, न्यू इंग्लिश स्कूल भेडशी, खर्डेकर कॉलेज वेंगुर्ला, अर्जुन रावराणे विद्यालय, वैभववाडी या ठिकाणी आहेत.

या परीक्षेचा निकाल ३ एप्रिल २०२५ रोजी जाहीर करण्यात येणार असून उत्तरपत्रिका OMR पद्धतीची असल्याने संगणकाद्वारे तपासली जाणार आहे. तसेच निकाला दिवशी पालक/शिक्षक/विद्यार्थी यांना निकाल व सोडवलेली उत्तरपत्रिका ऑनलाईन पाहता येणार आहे. यावर्षी सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षा सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर व ठाणे जिल्हात आयोजित करण्यात आली आहे. युवा संदेश प्रतिष्ठाचे संस्थापक अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत आणि अध्यक्षा संजना संदेश सावंत यांनी सिंधुरत्न टॅलेंट सर्च (STS) परीक्षा २०२५ साठी सर्वांना शुभेच्छा दिल्या. अधिक माहितीसाठी STS परीक्षा प्रमुख सुशांत मर्गज ९४२०२०६३२६, प्रमोद पवार ९४२१२६६७५१ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.