You are currently viewing गंमत पावसातील

गंमत पावसातील

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री सौ आदिती मसुरकर यांची अप्रतिम बालगीत रचना

चला चला रे सारे या
अंगणात जमूया
पावसाच्या सरींनी
अंग सारे भिजवुया

घुडुम् म्हताऱ्याआजीला
वर अवकाशात पाहूया
आवाज होता ढगांचा
कुशीत आईच्या लपूया

चमकणाऱ्या विजांपासून
दूर आपण राहूया
कोसळणाऱ्या धारांसंगे
पाऊस गाणे गाऊया

भरलेल्या डबक्यात
बेडूक उड्या मारूया
बेडकांच्या सूरात रे
सूर आपले मिसळूया

रानातल्या मयुरासम
सुंदर नृत्य करूया
पडणाऱ्या सरींनी
आजीचे मडके भरूया

इंद्रधनूच्या कमानीखाली
एक सेल्फी घेऊया
झुळझुळ वाऱ्यासवे
थेंब पावसाचे झेलूया

वाहणाऱ्या पाण्यामध्ये
कागदी होड्या सोडूया
हिरव्यागार सृष्टीमध्ये
मग आनंदाने डोलूया

*✒️©आदिती मसुरकर*
*कुडाळ सिंधुदुर्ग*

प्रतिक्रिया व्यक्त करा