You are currently viewing सखया रे

सखया रे

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास म्हणजे सदस्य लेखक कवी हेमंत कुलकर्णी यांची अप्रतिम काव्यरचना

उन्हाळ्यात घालमेल तगमग ती रखरखता
तुझ्यामुळे सुसह्यता शीतलता अनुभवता

पावसात मुंबईत धोधो जरि वर्षसरी
थांबताच तळमळतो, बघता तुज हर्षभरी

आॅक्टोबर दाह पुरा उन्हाळाच होय खरा
तू असता निभावून नेशी मग मनोहरा

हिवाळ्यात विरहतोस रूसतोस कधीकधी
एक-दीड मास सरे भेटतोस अधीमधी

म्हणणारे म्हणती तुज श्रीमंती थाटमाट
असूयेत जळणारे करताती थयथयाट

आधारच वाटतोस वावरता मुंबपुरी
प्रवासात दुकानात कार्यालय आणि घरी

वर्षमास आयुष्यच व्यापलेस तू माझे
*एसी* मम *सखया रे* कसे उतरु मी ओझे

*(वृत्त—दासी. भृंगावर्तनी, समजाति ६,६,६,६)*

— हेमंत कुलकर्णी,
मुलुंड, मुंबई

प्रतिक्रिया व्यक्त करा

11 + 3 =