मुंबई –
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड येथील तांबळडेग गावातील मुंबईस्थित सेवानिवृत्त मुख्याध्यापिका श्रीमती मृणालिनी पांडुरंग कांदळगावकर यांनी दि. १० जुलै रोजी सायंकाळी ७.३० वाजता विक्रोळी ( पूर्व) येथे रहात्या घरीच अखेरचा श्वास घेतला. त्या मुत्यूसमयी ८५ वर्षाच्या होत्या. त्यांच्या पश्चात व्यावसायिक मुलगा शशांक कांदळगावकर, सूनबाई, विवाहित मुलगी, एक अविवाहित मुलगी , नातवंडे, पुतणे, जावा असा परिवार आहे. मृणालिनी कांदळगावकर या ठाणे महापालिका शाळांतील कळवा येथील शाळेतून सेवानिवृत्त झाल्या होत्या. त्यांनी पतीच्या सामाजिक कार्यात सहकार्य केले होते. त्या विद्यार्थ्यांप्रिय शिक्षिका म्हणून परिचित होत्या. त्याचं अल्प आजाराने निधन झाल्याचं समजताच तांबळडेग, विक्रोळी परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली. रात्री त्यांच्या मृतदेहावर विक्रोळी टागोरनगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अंत्य दशर्न घेऊन सहवेदना व्यक्त केल्या. त्याचं धार्मिक विधी १९ जुलै रोजी शिवाजी पार्क येथील होईल. तर तेरावे २२ जुलै रोजी रहात्या घरीच होईल असे कुटुंबाच्या वतीने सांगण्यात आले आहे.