You are currently viewing महिला काथ्या कॉयर क्लस्टर मशीनचा एम.के. गावडे यांच्या हस्ते शुभारंभ.

महिला काथ्या कॉयर क्लस्टर मशीनचा एम.के. गावडे यांच्या हस्ते शुभारंभ.

महिला काथ्या कॉयर क्लस्टर मशीनचा एम.के. गावडे यांच्या हस्ते शुभारंभ.

वेंगुर्ला.
महिला काथ्या कामगार औद्योगिक सहकारी संस्थेच्या आवारात महिलांच्या तसेच नारळ उत्पादक शेतकऱ्यांच्या उन्नतीच्या दृष्टीने साकारलेल्या महिला काथ्या कॉयर क्लस्टरची संपूर्ण मशीन जोडणे झाली असून उत्पादन सुरू करण्यासाठी सज्ज झालेल्या मशिनरीच्या बॉयलर प्रज्वलित करण्याचा शुभारंभ महिला काथ्या क्लस्टरचे चेअरमन एम.के. गावडे यांच्या हस्ते वेंगुर्ला-कॅम्प येथे पार पडला.
महिला काथ्या कॉयर क्लस्टर कोकणातल्या नारळ उत्पादक शेतकरी, काथ्या उत्पादक कंपनी व अनेक हजारो महिलांना रोजगार उपलब्ध करून शकणार आहात प्रकल्प आहे. या पूर्ण मशनरीची जोडणी झाल्यानंतर महत्त्वाचा टप्पा अत्यावश्यक सेवा म्हणून बॉयलरची आवश्यकता असते. ज्याप्रमाणे साखर कारखान्यात बॉयलर प्रज्वलित करावा लागतो, त्याचप्रमाणे रबराईज कॉयर शिट उत्पादनामध्ये बॉयलरची भूमिका महत्त्वाची असते,अशी माहिती यावेळी एम.के. गावडे यांनी दिली.
यावेळी महिला काथ्या संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालिका प्रज्ञा परब, महाराष्ट्र बँकेचे शाखा व्यवस्थापक राजेंद्र वेळकर, माधवी गावडे, प्रवीणा खानोलकर, कंपनी मॅन्युफॅक्चरचे जॉन जर्सन, बाळकृष्ण बॉयलर गुजरातचे जय जोशी, ए.सी. मिथुन, टी.साजिद, अरुणा परब, अश्विनी पाटील, चंद्रकांत जाधव, रंजना कदम आदी उपस्थित होते. येत्या पंधरा दिवसात पूर्ण तपासणी करून उत्पादनाचे प्रात्यक्षिक घेतले जाणार आहे. एकूण मशीनरी ४.५ कोटीची असून बॉयलर साठी ५० लाख खर्च आला असल्याचे श्री गावडे यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × 5 =