You are currently viewing भक्ती गीत

भक्ती गीत

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री सौ भारती वाघमारे यांची अप्रतिम काव्यरचना

नाम विठ्ठलाचे घेऊ .
चला पंढरीला जाऊ ||ध्रु||

गळा तुळशीचा हार ,
विठ्ठल उभा विटेवर ,
चला हरीचे सुंदर रूप पाहू .
नाम विठ्ठलाचे घेऊ
चला पंढरीला जाऊ ||१||

चंद्रभागे तेरी वसली पंढरी
रखुमाई शेजारी विठ्ठल उभा विटेवरी
चला सुंदर रूप विठ्ठल रखुमाईचे पाहू.
नाम विठ्ठलाचे घेऊ
चला पंढरीला जाऊ||२||

नाम घेता विठ्ठल मन शांत होई. आषाढी वारीला भक्ती चालती पायी पायी .
चला अभंग गीत गाऊ .
नाम विठ्ठलाचे घेऊ .
चला पंढरीला जाऊ.

पांडुरंगाच्या अंगणात,सोहळा पालखीचा सजला.
विठ्ठलाच्या भजनात भक्त, नाचण्यात दंगला.
चला सोहळा रिंगणाचा पाहू.
नाम विठ्ठलाचे घेऊ.
चला पंढरीला जाऊ .||४||

सौ भारती वसंत वाघमारे
राहणार -मंचर तालुका- आंबेगाव
जिल्हा -पुणे

प्रतिक्रिया व्यक्त करा