You are currently viewing असरोंडी बौद्धवाडी लगत रस्त्यावरील साचलेले पाणी जाण्यास वाव नाही

असरोंडी बौद्धवाडी लगत रस्त्यावरील साचलेले पाणी जाण्यास वाव नाही

शाळकरी मुलांना त्रास सहन करावा लागतोय

*मालवण :*

असरोंडी बौद्धवाडी लगत रस्त्यावरील साचलेले पाणी जाण्यास वाव नसल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहते. कणकवली ते मालवण जाणारा हा रस्ता जि. प. च्या मालकीचा असून सुद्धा या रस्त्याला गटार नाही. याचा मनस्ताप वाहनचालक आणि शाळकरी मुलांना सहन करावा लागत आहे.

या साचलेल्या पाण्यामुळे वाहनचालकांना पुढील प्रावसावेळी रस्त्याचा अंदाज न आल्यास अपघात देखील होण्याची शक्यता आहे. याकडे संबंधित प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे. नागरिक देखील या समस्येला संतापले असून स्थानिक पातळीवर त्यावर काही मार्ग निघत नसल्याचे सांगितले. पण जर रस्ता जि. प. च्या मालकीचा मग त्याला गटार का नाही? असा प्रश्नही नागरिकांनी उपस्थित केला.

साचलेल्या पाण्यामुळे शाळकरी मुलांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. मागुन – पुढून येणाऱ्या वाहनांना मार्ग देत अंगावर चिखल घेतच शाळेत जावं लागतं आहे. प्रशासन आणि यंत्रणा आता तरी याकडे जाणीवपूर्वक लक्ष देईल का? असा प्रश्न स्थानिकांनी उपस्थित केला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा