खबरदारी घेण्याचे तहसीलदार मारुती कांबळे यांचे आवाहन
देवगड
पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहणार असून दिनांक ८ ते १२ जुलै या कालावधीत सुमारे ६५ किलोमीटर वेगाने वारी वाहण्याची शक्यता आहे समुद्रात जोरदार लाटा उसळत असून सुमारे साडे चार मीटर उंचीच्या लाटा समुद्र किनारी उसळण्याची शक्यता आहे. समुद्रकिनारी व खाडी किनारी राहणाऱ्या नागरिकांनी सतर्क करावे असा इशारा प्रादेशिक हवामान विभागाकडून देण्यात आला आहे .अशी माहिती देवगड तहसीलदार मारुती कांबळे यांनी दिली आहे.
दरम्यान नागरिकांनी खबर द्यावी घ्यावी. किनारपट्टी भागात राहणाऱ्या नागरिकांनी अधिक सतर्क राहावे कोणतीही समस्या उद्भवल्यास अथवा कोणत्याही मदतीची आवश्यकता निर्माण झाल्यास देवगड तहसील कार्यालय येथे कंट्रोल रूम फोन नंबर ०२३६४ -२६२२०४ या ठिकाणी संपर्क साधावा. तसेच पंचायत समिती नगरपालिका पोलीस स्टेशन या ठिकाणी संपर्क साधल्यास तात्काळ मध्ये उपलब्ध केली जाईल .तालुक्यातील प्रशासकीय यंत्रणाही सज्ज असल्याचे तहसीलदार मारुती कांबळे यांनी सांगितले.