You are currently viewing तौक्ते चक्रीवादळळात नुकसान झालेल्या आंबा बागायतदारांना बाळ सरजोशी चँरीटेबल ट्रस्टच्यावतीने १५० आंबा कलमांचे वाटप

तौक्ते चक्रीवादळळात नुकसान झालेल्या आंबा बागायतदारांना बाळ सरजोशी चँरीटेबल ट्रस्टच्यावतीने १५० आंबा कलमांचे वाटप

ट्रस्टचे अध्यक्ष निलेश सरजोशी यांच्या हस्ते वाटप

मालवण

तौक्ते चक्रीवादळाचा तडाखा बसून आचरे पंचक्रोशीत मोठया प्रमाणावर आंबा कलमाचे नुकसान झाल्याने संकटात सापडलेल्या आंबा बागायतदार शेतकऱ्यांना बाळ सरजोशी चँरीटेबल ट्रस्ट आचरे यांच्यावतीने १५० आंबा कलमांचे वाटप ट्रस्ट चे अध्यक्ष निलेश सरजोशी यांच्या हस्ते करण्यात आले.

तौक्ते चक्रीवादळात आचरे गावातीळ काही फळधारणा होणारी आंबा कलमे उन्मळून पडली तर काही कलमे मोडून पडल्याने आंबा बागायतदार आर्थिक संकटात सापडला. अशा आचरा गावातील शेतकऱ्यांना आधार मिळावा आणि पर्यावरण संवर्धन व्हावे या उद्देशाने बाळ सरजोशी चँरीटेबल ट्रस्ट तर्फे आंबा कलमांचे वाटप करण्यात येणार आहे. याचा शुभारंभ ट्रस्ट चे अध्यक्ष निलेश सरजोशी यांच्या हस्ते रविवारी करण्यात आला.

यावेळी त्यांच्या सोबत केंद्र प्रमुख सुगंधी गुरव, अभय भोसले, विनायक परब,मुख्याध्यापक मारुती आचरेकर, माजी सरपंच चंदन पांगे, शंकर मिराशी, बबन शेट्ये, मंदार सरजोशी, विजय कदम, आचरा व्यापारी संघटनेचे हेमंत गोवेकर, चंदू कदम, रुपेश हडकर, सायली आचरेकर, यांसह अन्य मान्यवर आदी उपस्थित होते. यावेळी ट्रस्ट चे अध्यक्ष निलेश सरजोशी यांच्या ४४ व्या वाढदिवसानिमित्त ४४ पळसाच्या रोपांचे वाटप करण्यात आले

प्रतिक्रिया व्यक्त करा

12 − 8 =