ऑनलाईन-ऑफलाईन सगळे पास; दुष्परिणामाचे काय?

ऑनलाईन-ऑफलाईन सगळे पास; दुष्परिणामाचे काय?

पहिली ते आठवीपर्यंत सर्वांनाच पास करण्याचा निर्णय जाहीर झाला. आज विद्यार्थ्यांना आणि पालकांना या निर्णयाचा नक्कीच आनंद होईल. परंतु, यातून दीर्घकालीन नुकसान होते आहे याकडे लक्ष द्यायला हवे. अभ्यासक्रमाची रचना ही मागील वर्षीच्या अभ्यासक्रमावर आधारित पुढील अभ्यासक्रम अशी असते. संपूर्ण एक वर्षात विद्यार्थी फारसे काही शिकले नाहीत हा महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यासाठी सरकार या वर्षीच्या अभ्यासक्रमातील घटक पुन्हा पुढच्या वर्षीच्या अभ्यासक्रमांत टाकून अभ्यासक्रमाची फेररचना करणार आहे का? याचे उत्तर मिळायला हवे कारण कौशल्य प्राप्त न होता असेच विद्यार्थी पुढे जात राहिले तर उच्च शिक्षणात या विद्यार्थ्यांच्या हाताला काहीच लागणार नाही व हे विद्यार्थी गळती होण्याचा खूप मोठा धोका संभवतो.

प्रतिक्रिया व्यक्त करा